Maharashtra Breaking News: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
LIVE

Background
Maharashtra Breaking News: अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयातशुल्क लावलंय. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल एक्स पोस्ट केलीय. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही म्हटलंय. भारत स्वतः जे आयातशुल्क लावतो, ते जगातील सर्वाधिक शुुल्कांमध्ये गणलं जातं. तसंच, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च तेल आयात करतो, एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामुग्री विकत घेतो, हे सगळं अजिबात ठीक नाही.. त्यामुळे भारत आता २५ टक्के आयातशुल्क भरणार, आणि त्याव्यतिरिक्त दंडही आकारला जाणार, आणि हे वाढीव शुल्क १ ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून लागू होणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. तसेच आज बहुप्रतिक्षित मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
हिंजवडी सरपंचांचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल, आमचा आवाज कोण ऐकणार?
पिंपरी चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते. यावर गणेश जांभूळकर यांनी अखेर त्यांची भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या विकास कामांना आमचा विरोध नाही. परंतु ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला असून केवळ ते आयटीयन्स यांचं ऐकतात, आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही. मुळात हिंजवडी गावच्या समस्या नसताना नाव हिंजवडीच खराब होत आहे. गावकऱ्यांच म्हणणं ऐकून घ्यावे. अनेक मंदिर, शाळा, घरे रोड मध्ये जाणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना सरपंच गणेश जांभुळकर यांनी हात जोडून विनंती केली आहे की, यापुढे तरी आम्हाला विश्वासात घेऊन हिंजवडीतील कामे करावीत.
महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : महादेव मुंडे प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना तात्काळ विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित पत्नीच्या मागणीनुसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. या पथकात PI संतोष साबळे (जालना) आणि API सपकाळ (बीड) यांचाही समावेश आहे.























