Maharashtra Live Updates : एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर भाजपकडून आभार
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे, मुख्यमंत्रिपदासोबतच राज्यात कोणाकोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे स्वागत, ते रडणारे नाहीत तर लढणारे नेते : चंद्रशेखर बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल विरोधक वावड्या उठवत होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाला समर्थन दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी त्यांचे आभार मानतो. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून पण उत्तम काम केले. त्यांनतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साथ दिली. एकनाथ शिंदे रडणारे नाही तर लढणारे आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी लढून बाहेर पडले होते. महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्यात योग्य भूमिका मांडली, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मोदी-शाहांना फोन करुन सांगितलं, तुमचा निर्णय मला मान्य असेल : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मी महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, ही सर्वात मोठी व्हिक्टोरी आहे, महायुतीचा विश्वास, विकास कामे जी महाविकास आघाडीने थांबवली ती आम्ही सुरू केली, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली.
मोठ्या प्रमाणावर हा विजय जनतेचा आहे, निवडणुकीच्या वेळी आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले. रात्रभर काम करायचो, 2 3 तास झोपायचो आणि पुन्हा काम करायचो. मी मोजल्या नाहीत पण 70-80 सभा घेतल्या. मी आधी देखील कार्यकर्ता म्हणून काम केले पुढे देखील करेन. मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले, तीच माझी धारणा होती, म्हणून लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मी देखील सर्व सामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून आलो आहे.
लाडके भाऊ, शेतकरी, लाडक्या बहिणी अशा सर्वांसाठी काही ना काही करायचे होते. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांना ते कसे कळणार.
एक को सिस्टिम तयारी झाली, घरातील सर्वांना काही न काही मिळणार हे तयार केले, सरकार म्हणून काय करणार अजून? मी आनंदी आहे, खुश आहे.
केंद्रातून मोदी शाह साहेबांचे पूर्ण पाठबळ आम्हाला होते. मला ते दिवस आठवतात जेव्हा मला मुख्यमंत्री करत होते.
आम्ही सर्व प्रश्न सोडवले, काहीच ठेवले नाहीत, .राज्याच्या प्रगतीचा वेग बघा, राज्य एक नंबरला नेण्याचा काम आम्ही केले. मागच्या अडीच वर्षात राज्य तिसऱ्या नंबरला गेले. आम्ही आल्या आल्या ते पहिल्या नंबरला आणले.
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झाली, ही ओळख मला मोठी वाटते, मी समाधानी आहे,
आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे लोक आहोत. माझ्या रक्ताचा शेवटच थेंब असे पर्यंत मी जनतेसाठी काम करेन. मी जीव तोडून काम केलं, त्यामुळेच हे यश प्राप्त झालं. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं ते महत्त्वाचं आहे.
कुठे घोडे अडले नाही, मी मोकळ्या मनाचा माणूस आहे, ताणून ठेवणारा माणूस नाही. मला सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद मला नशिबाने मिळालं आहे. म्हणून मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना किंवा निर्णय घेताना कोणतंही अडचण माझ्यामुळे येणार नाही, तुम्ही आम्हाला मदत केली, संधी दिली, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय जो आहे, तो महायुतीचे आणि NDA चे प्रमुख म्हणून तुमचा निर्णय भाजपसाठी अंतिम असेल तसंच तो आमच्यासाठीही अंतिम असेल, असं सांगितलं. मोदी आणि अमित शाहांना मी फोन करुन सांगितलं, माझी अडचण नसेल, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
आता महायुती म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. महायुती म्हणून लोकांनी मँडेट दिलं आहे























