Maharashtra Breaking LIVE: राज्यात थंडीचा जोर कायम, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा तिढा कधी सुटणार? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर..
Maharashtra Breaking News 13th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
Maharashtra Breaking News 13th December 2024 Live Updates: सध्या राज्याचे चित्र पाहता काही भागात थंडीचा जोर वाढतोय. ज्यामुळे ठिकाठिकाणी शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर महाआघाडी सरकारमध्ये कोणत्या पक्षातून किती आणि कोणते मंत्री केले जाणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार भाजपमधून 20 मंत्री केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून 12 मंत्री केले जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पक्षातील 10 मंत्र्यांचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे
दु:खद बातमी! सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ख्यातनाम काष्ठशिल्पकार प्रा. मनोहर सप्रे यांचे निधन
चंद्रपूर : सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि ख्यातनाम काष्ठशिल्पकार प्रा. मनोहर सप्रे यांचे निधन झाले आहे. चंद्रपुरात त्यांच्या शास्त्रीनगर येथील राहत्या घरी वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने झाले निधन झाले आहे. या दु:खद घटनेने मराठी-इंग्रजी माध्यमातील रेखाचित्रांचा अनुभवी साधक हरपला आहे.
प्रा. मनोहर सप्रे यांनी दीर्घकाळ वर्तमानपत्रे आणि मासिकातुन व्यंगचित्र रेखाटने आणि पर्यावरण संवर्धन विषयक जाणीव जागृती केली आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. उद्या चंद्रपुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाण्याची प्राथमिक माहिती आहे.
ऑनलाइन मशीनसह बंद सर्वरचा मोफत धान्य वाटप केंद्रांना फटका; लाभार्थ्यांचे हाल
नाशिकमध्ये मोफत धान्य वाटप केंद्र बंद असल्याची बातमी समोर आली आहे.
सर्वर बंद असल्याने या महिन्याचे धान्य वितरण ठप्प झाले आहे.
परिणामी, नाशिकमधील अनेक धान्य वाटप केंद्रावर या महिन्याचे धान्य तसेच पडून आहेत.
ऑनलाइन पद्धतीने धान्य वाटप केले जाते, मात्र ऑनलाइन मशीन बंद असल्याने धान्य दुकानदारांची कोंडी झाली आहे.
स्वस्त धान्य दुकानात चालू महिन्याचे धान्य तसेच पडून आहे. तर लाभार्थ्यांवर चकरा मारण्याची वेळ आली आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांनी ऑनलाइन प्रक्रिया चालू होत नाही तोपर्यंत धान्य वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन ते तीन दिवसात सर्वर पुन्हा पूर्व पदावर येऊ शकते, अशी माहिती धान्य दुकानदारांनी दिली आहे.

पुष्पा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
हैदराबाद थिएटरमधील चेंगराचेंरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.
पुष्पा 2 च्या प्रीमियरला चेंगराचेंरी झाली होती
Bogus Pik Vima Scam : राज्यात बोगस पीक विम्याचा सुळसुळाट! एकट्या सोलापूरात तब्बल 45 हजार हेक्टर क्षेत्राचा बोगस विमा
Bogus Pik Vima Scam सोलापूर: प्रत्यक्षात कांदा पिकाची लागवड न करताच सोलापुरात तब्बल 45 हजार हेक्टर क्षेत्राचा बोगस विमा काढण्यात आलाय. राज्यभरात बोगस पीक विम्याचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. त्यातच सोलापुरात देखील अनेकांनी बोगस पीक विमा काढल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात खरीप पिकात सुमारे 38 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली. पण विमा काढताना जवळपास 1 लाख 31 हजार शेतकऱ्यांनी 85 हजार हेक्टर कांदा क्षेत्र दाखवत विमा उतरवला आहे. यामध्ये 45 ते 47 हजार हेक्टर क्षेत्रावर काहीच नसताना बोगस विमा उतरवल्याचे समोर आले आहे. दरम्यान कृषी विभागाचे या संदर्भाची माहिती आता विमा कंपनीला कळवली असून विम्यापोटी द्यावा लागणारे 24 कोटी रुपयांची बचत एकट्या सोलापूर जिल्ह्यात होणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक शुक्रचार्य भोसले यांनी दिली..