Maharashtra Breaking 7th July LIVE Updates: नाशकातील देवळात भीषण अपघातात एक जण ठार तर 4 जण जखमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Dhule : धुळे जिल्ह्यातील 57 जागांसाठी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर आज लेखी परीक्षा शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात शांततेत पार पडली, यावेळी परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षेचे चित्रीकरण करण्यात आलं आहे. तसेच परीक्षा केंद्रावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः लक्ष ठेऊन होते.
Yavatmal : पोलीस आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 45 पोलीस शिपाई पदासाठी आज सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळात गोधणी मार्गावरील अँग्लो हिंदी हायस्कूल येथे लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत ही लेखी पोलीस भरती परीक्षा होत असून परीक्षेसाठी उमेदवारांना काळा बॉल पेन पोलीस दलाकडून देण्यात आला आहे. केवळ याच पेनचा लेखी परीक्षेसाठी वापर करता येणार आहे. महाराष्ट्रात या पद्धतीची ही भरती यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच राबवण्यात येत असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सांगितलं.
Pune : पुण्यात ध्वनी प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. दिवसेंदिवस पुण्यात लोकसंख्या वाढतेय, त्यामुळे ट्रॅफिक देखील वाढलं आहे. याच ट्रॅफिकमुळे आणि बाकी अनेक कारणांमुळे ध्वनी प्रदूषणाचा धोका वाढत आहे.याच ध्वनी प्रदूषणाचा धोका पाहून EnOTH welfare foundation आणि चितळे ENT hospital यांच्याकडून पुण्यात lets walk for loud noise protection चं आयोजन करण्यात आलं होतं. यात अनेक पुणेकरांनी सहभाग घेतला आणि ध्वनी प्रदूषणांसंदर्भात जनजागृती केली.
Baramati : आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं काटेवाडी इथं मेंढ्यांचं गोल रिंगण होत आहे. दरम्यान काटेवाडीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. काटेवाडीत अजित पवार यांचं निवासस्थान आहे. या ठिकाणी वारकऱ्यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण असतं. याचसाठी राष्ट्रवादीच्या खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची देखील लगबग सुरू आहे. त्यादेखील वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करत आहेत. त्या देखील वारकऱ्यांची सेवा म्हणून स्वतः चपात्या लाटून जेवण बनवत आहेत.
Pune Fire : सकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. मुलांच्या वसतिगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठयासाठी वापरण्यात येणाऱ्या सीटी मीटरने पेट घेतला होता, यादरम्यान मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. परंतु, त्याचवेळी तेथील कर्मचारीवर्गाने तातडीने अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन आग विझवण्याचा प्रयत्न करत अग्निशमन दल आणि महावितरण विभागास संपर्क केला होता. नंतर ही आग विझवण्यात यश आलं आहे.
Sharad Pawar Baramati : शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार जनता दरबार घेत आहेत..नागरिकांनी या जनता दरबाराला गर्दी केली आहे.. तर दुपारी दीड वाजता शरद पवार बारामती तालुक्यातील पिंपळी येथे संविधान समता दिंडीत सहभागी होणार आहेत. शरद पवार थेट संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होणार नसल्याची प्राथमिक माहिती आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात संविधान समता दिंडी चालते आहे. त्या संविधान समता दिंडीला शरद पवार भेट देतील.. या कार्यक्रमाला महात्मा गांधीचे नातू तुषार गांधी, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार उपस्थितीत असतील.
Konkan Rain : कोकणात सध्या समाधानकारक पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आलेला आहे. पदांच्या पाणी पातळीमध्ये देखील सध्या चांगली वाढ झाली असून प्रमुख नद्या ह्या दुथडी भरून वाहत आहेत. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Wardha News: ई-संवाद या नावीण्यपूर्ण उपक्रमात पोलिस विभागाने नागरिकांशी ऑनलाईन पद्धतीनं व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधलाय. विविध पोलिस स्टेशनमधुन 70 तक्रारदारांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधून मांडल्या समस्या.
Nashik News : नाशिकच्या सौंदाणे - देवळा रस्त्यावर पावजी देव फाट्याजवळ हुंडाई सेंट्रो कार आणि एम.जी.हेक्टर या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. गणेश सुभाष ततार रा.कळवण हे अपघातातील मयताचे नाव आहे. अपघातातील चारही जखमी हे मध्य प्रदेश राज्यातील इंदौर येथील असून ते सप्तशृंग गडावरून दर्शन घेवून परतत असतांना सौंदाणे - देवळा रस्त्यावरील मातोश्री फार्मसमोर हा अपघात घडला. जखमींना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..
Chandrapur News: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या व्याहाड-खुर्द या गावी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आज आयोजित करण्यात आला होता. चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्या. तर गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारला. आपल्या भाषणातून त्यांनी राज्यात महाविकास आघाडी व काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचे सांगत मुख्यमंत्री.... मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या. लोकसभेत महाविकास आघाडीला 30 खासदार जनतेने दिले असून विधानसभेत 200 आमदार निवडून आणू असा निर्धार वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
Ahmednagar News : अहमदनगर : शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खा.निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मविआच्या "शेतकरी जन आक्रोश" आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे... आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आंदोलन स्थळी भेट देणार आहेत...शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आंदोलनस्थळी यावं अशी भूमिका खा.निलेश लंके यांची आहे...मात्र निवासी उपजिल्हाधिकारी , प्रांताधिकारी यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आंदोलन स्थळी भेट दिली होती,पण जिल्हाधिकाऱ्यांनीच आंदोलकांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचव्यावत अशी भूमिका निलेश लंके यांनी घेतली आहे त्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे...दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या दिवशी म्हंजेव्ह उद्या खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील भेट देणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली.
Dharashiv News: धाराशीव जिल्ह्यातील उपळा माकडाचे या गावात शेगावचे संत गजानन महाराजांच्या पालखीवर जेसीबीतून फुलांची उधळण करून गावकऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं आहे. भक्तीमय वातावरणात गण गण गणात बोतेचा गजर करत मोठ्या भक्तीनं गजानन महाराजांचे दर्शन घेतले.
Nashik News: गेल्या महिन्याभरात एकदाच पावसाने हजेरी लावली आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्यात. मात्र पावसाने पाठ फिरवली अन् शेती पिके संकटात सापडले आहे. पिके करपू लागल्याने पिकांना वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे..विहिरीतील असलेल्या आहे त्या पाण्याचा उपयोग करून घेत मालेगाव तालुक्यातील शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करीत आहे. किमान पाऊस पडेपर्यंत या पाण्यावर तरी पिके जगतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाच्या पाण्याची गरज आहे.
Akola News: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेयेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केलेय. तर अन्य चार जण लपून बसल्याची भीती व्यक्त केली जातीये. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.
या हल्ल्यात अकोल्यातील एक जवान शहीद झालाय. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हा तरुण जवान शहीद झाला आहे. जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोककुल वातावरण पसरल आहे. 2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झालाय. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालंये. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहेय.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -