Maharashtra Breaking Updates LIVE : भाजपा नागपूर जिल्ह्यातील पूर्ण जागा लढणार, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking News Live : सध्या देशासह राज्यातही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे पाहात आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत. दुसरीकडे राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घाडमोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी आज हायकोर्टाचा निकाल
शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी आज हायकोर्टाचा निकाल
तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणी करत पत्नी तेजस्वीनी घोसाळकर यांची हायकोर्टात याचिका
10 जुलै रोजी राखून ठेवलेला निकाल आज मुंबई उच्च न्यायालय जाहीर करणार
तपास एसआयटीकडे जाणार की मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडेच राहणार यावर हायकोर्ट निर्णय देणार
मुंबई पोलिसांचा तपास राजकीय दबावाखाली सुरू असून तो योग्य दिशेनं होत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप
8 फेब्रुवारी 2024 रोजी दहिसर परिसरात गोळ्या झाडून करण्यात आली होती अभिषेक घोसाळकर यांची हत्या
मॉरिस नरोन्हा नावाच्या इसमान त्याच्या ऑफिसमध्ये घोसाळकर यांना सोशल मीडियावर लाईव्हला बसवून केलं होतं या हत्येचं लाईव्ह चित्रिकरण
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फुलांच्या दरात मोठी वाढ
दादर फूल मार्केट रेट नेहमीचे आणि आजचे
झेंडू नेहमी ४० आज ११०
गुलाब नेहमी ८० आज -११०
गुलछडी नेहमी २०० आज १०००
शेवंती नेहमी १०० आज ३०० ते ४००
जास्वंदी नेहमी ५० आज ५०० शेकडा
दुर्वा जूडी नेहमी १० आज ३० ते ४०
कापरी नेहमी ५० आज १२०
अष्टर नेहमी १२० आज २००























