Maharashtra Breaking 6th July LIVE Updates: धक्कादायक! रुग्णांच्या रिपोर्टच्या पेपर प्लेट बनून केईएम रुग्णालयात केला जातोय वापर
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Nashik News: पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग कसारा येथे तुटली, वाहतूक विस्कळीत
Nashik News: मनमाडहून मुंबईला निघालेल्या पंचवटी एक्स्प्रेसच्या डब्यांचे कपलिंग निघाल्याची घटना कसारा स्थानकात आज सकाळी घडली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ऐन पावसात ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास कसारा स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसचे तीन आणि चार क्रमांकाचे डबे इंजिनपासून वेगळे झाले. त्यामुळे गाडी काही अंतरावर जाऊन थांबली. रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ डबे जोडून गाडी पुढे धावल्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत प्रवाशांनी गर्दी करून व्हिडीओ व्हायरल केले. फोटो समाज माध्यमांवर आल्याने नेमका अपघात किती मोठा आहे, याची चर्चा सुरू होती.
या गाडीने हजारो प्रवासी मनमाड, इगतपुरी, नाशिक येथून मुंबईत येतात, संध्याकाळी प्रवास करतात. वर्षानुवर्षे ही गाडी प्रवाशांना सेवा देते. या गाडीबद्दल प्रवाशांना आकर्षण असून अनेकांना सोयीची ही गाडी असल्याने अपघात झाला तरी प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करत पावसाचे दिवस असल्याने अशा घटना घडू शकतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त दिली.
CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा माणगावमध्ये उपक्रम
CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक महीला या योजनेचा लाभ घेताना सेतू केंद्रावर अर्ज भरण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. गरजू आणि गरीब महिलांना याचा लाभ मिळावा याकरता राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये या उपक्रमाच अयोजन केलं आहे. यावेळी हजारोंच्या संख्येनं महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड देखील उपस्थीत आहेत.
























