Maharashtra News Live Updates : नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांनी तयारी चालू केली आहे. तर राजकीय नेतेंमडळी तिकीट मिळवण्यासाठी धडपडताना दिसतायत. निवडणूक लक्षात घेता सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून जनतेला मोठी आश्वासनं दिली जात आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिकमध्ये बैठक सुरू
नाशिक ब्रेकिंग. - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरू...
- पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित ठाकरे मात्र खुर्चीवर न बसता शेजारी उभे राहून बैठकीत उपस्थित...
- नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंचा संवाद...
- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंकडून दिल्या जात आहेत सूचना...
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अविनाश अभ्यंकर आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी किशोर शिंदे आणि प्रमुख नेते उपस्थित...
काँग्रेस हिंदुद्वेषी, राहुल गांधी ऐन नवरात्रीत कोल्हापूरला येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत - आचार्य तुषार भोसले
कॉंग्रेस पार्टी हिंदुद्वेषी पार्टी आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे काल राहुल गांधी ऐन नवरात्रीत कोल्हापूर ला येऊन सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत. याचे कारण त्यांच्या ख्रिश्चन आईने बिंबवलेले ख्रिश्चन संस्कार तर दुसरीकडे लोकसभेला एकगठ्ठा मिळालेली मुसमानांची मते गमावण्याची भीती हे आहे. महाराष्ट्रातल्या सजग हिंदुंनी कॉंग्रेस पार्टीचा हा हिंदु विरोधी चेहरा ओळखला पाहीजे आणि त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहीजे.























