Maharashtra Breaking 3rd August LIVE Updates :राज्यात पुढील दोन दिवस पावसाचं धुमशान, कोकणासाठी ऑरेंज अलर्ट, मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Breaking 3rd August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
Maharashtra Breaking 3rd August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी, सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यात वाद
शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी..
माजी आमदार सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यात वाद
अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावर घेतल्याने पाटील आक्रमक
मराठवाड्यात पक्ष संपलेला असताना आपण उर्जित अवस्था आणली...
पक्षात आमचा अनादर होता कामा नयेत..
जयंतभाई पक्षात दादागिरी करू नका...
माजी आमदार सुभाष पाटील शेकापच्या अधिवेशनात आक्रमक
Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, ठाणे आणि उपनगरात पावसाचा जोर राहणार
Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई, ठाणे आणि उपनगरात पावसाचा जोर राहणार आहे.
मुंबईतही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे.
सध्या तरी मुंबईच्या सखल भागात पाणी साचलेलं नाही. मात्र पावसाचा जोर जर वाढला तर मात्र पाणी भरण्यास सुरुवात होवू शकते. वाऱ्याचा वेग ताशी ५२ किमी आहे. त्यामुळे समुद्राच्या प्रचंड लाटा आपल्याला बघायला मिळत आहे. शनिवार रविवारी असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबकर येथे येतील मात्र दोन दियस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरीकांनी समुद्र किनारी येणं टाळावे असं आवहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासापासून मुसळधार पाऊस सुरू,अंधेरी सबवे पाण्याखाली
Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे...
अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे...
Dhule : धुळ्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन
Dhule : धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवून तब्बल सहा पिस्टल आणि चार तलवारी जप्त करण्यात आले आहेत
Beed : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम ॲक्शन मोडवर, बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा
Beed : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम ॲक्शन मोडवर; बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा तर परळी मंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान
आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एमआयएम ॲक्शन मोडवर आली आहे.
आज एमआयएमच्या माध्यमातून तीन विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरुवात करण्यात आलाय.
छत्रपती संभाजी नगर येथे १४ जुलै रोजी असुद्दिन ओवेसी यांच्या उपस्थित बैठक पार पडली.
यानंतर आज गेवराई, माजलगाव आणि केज विधानसभा मतदारसंघाचा आढावा जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठक घेणार आहेत