Maharashtra Breaking LIVE: पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुतीत नाराज, पीआरपी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता
Breaking News Live Updates : राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे. या प्रकरणातील स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलला (Chetan Patil) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याती राजकारणही चांगलेच तापले आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणात वामन म्हात्रे यांना हायकोर्टाचा सोमवारपर्यंत अंतरिम दिलासा
महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणात वामन म्हात्रे यांना हायकोर्टाचा सोमवारपर्यंत अंतरिम दिलासा
कल्याण कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला म्हात्रेंकडून हायकोर्टात आव्हान
बदलापूरात चार वर्षांच्या मुलीवर शाळेत अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली
यानंतर याघटनेच्या विरुद्ध हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते
बदलापूर रेल्वे स्थानकात ८ ते ९ तास आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं
त्यावेळी या घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी आक्षेपार्ह भाष्य केलं होतं
त्यानंतर वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुतीत नाराज, पीआरपी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता
पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुतीत नाराज
पीआरपी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता
शिवसेना फुटीनंतर शिवसेना शिंदे गटासोबत पीआरपीने केली होती युती
मात्र गेल्या 2 वर्षापासून महायुतीत पीआरपीला उचित सन्मान आणि युतीतला वाटा मिळाला नसल्याने पीपल्स रिपब्लिकन पक्षात नाराजी
या नाराजीमुळे उद्धव ठाकरे गटातील नेत्यांचा पी.आर.पी. नेत्यांना फोन
पीआरपी पक्षाचे नेते लवकरच घेणार उद्धव ठाकरेंची भेट























