(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रात मविआचं सरकार येणार, लाडकी बहीण सोबत सुरक्षित बहीण आणणार : आदित्य ठाकरे
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप चालू आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. जागावाटपानंतर राज्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील घडामोडींचे हे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर.....
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी
छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाने देखील या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने लहू शेवाळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तर याच मतदारसंघात शरद पवार गटाचे पांडुरंग तांगडे यांना देखील पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध ठरला आहे.
बाळासाहेबांनी नातेवाईकांसाठी जागा सोडायला सांगितली नसती : सदा सरवणकर
बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मधे राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते. : सदा सरवणकर
सायन कोळीवाडा जागेवरुन भाजप नेत्यांमध्ये चर्चा
सायन कोळीवाडा जागेवरुन भाजप नेत्यांमध्ये चर्चा
सायन कोळीवाडा याठिकाणी राजश्री शिरोडकर होत्या इच्छुक
राजेश शिरवडकर आणि राजश्री शिरवडकर भाजप प्रदेश कार्यालयात दाखल
सायन कोळीवाडा मतदारसंघाचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन कार्यालयात दाखल
राजेश शिरवडकर आणि तमिल सेल्वन यांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न
शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे : नाना पटोले
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. अन्नदात्याला ताकद देणं, कर्जातून मुक्त करणं, शेतमालाला योग्य भाव देणं हे आमचं काम आहे, असं नाना पटोले म्हणाले.
पुण्यातील नवले ब्रीजवर अपघात
नवले पुलाजवळ एका उभ्या असलेल्या क्रेनला ट्रकची धडक
या अपघातात दोन जण अडकल्याची माहिती
पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची चार वाहने दाखल
एका व्यक्तीला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले
दुसऱ्याला काढण्याचे काम सुरू