Maharashtra Breaking LIVE : राज्य, देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : राज्यभरात पावसाच्या सरी बसरत आहेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. या घटनांसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सोलापुरात कोणताही परिणाम नाही
सोलापूर ब्रेकिंग
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सोलापुरात कोणताही परिणाम नाही
सोलापूर एसटी महामंडळ आगारातून सकाळपासून सुरळीत एसटी सेवा सुरु
सकाळपासून दुपारी 12 पर्यंत नियोजित सर्व 59 फेऱ्या सोलापूर आगारात पूर्ण
सोलापूर आगर प्रमुख नागेश जाधव यांची माहिती
हानगरपालिकेनंतर रेल्वेकडून अहमदनगरच्या नामांतराला हिरवा कंदील
अहमदनगर : महानगरपालिकेनंतर रेल्वेकडून अहमदनगरच्या नामांतराला हिरवा कंदील...
रेल्वेने अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यास दिली मंजुरी...
नामांतर केल्याचं रेल्वेकडून निवेदन...
स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
सिद्धार्थ खरात यांनी एक जुलैला मंत्रालयीन सहसचिव असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि त्यानंतर आता त्यांनी राजकारणात येण्याचा मार्ग स्वीकारला आहे...
आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या ठिकाणी दुपारी एक वाजता सिद्धार्थ खरात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ खरात हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे
सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग , ग्राम विकास विभाग , गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले असून राज्यमंत्री , कॅबीनेट मंत्री व केंद्रीय राज्य मंत्री यांचे खासगी सचिव म्हणून कामे केली आहेत
एसटी महामंडळाकडून राज्य सरकारला मध्यस्थी करत संपावर त्वरित मार्ग काढण्यासाठी पत्र व्यवहार
एसटी महामंडळाकडून राज्य सरकारला मध्यस्थी करत संपावर त्वरीत मार्ग काढण्यासाठी पत्र व्यवहार
एसटी महामंडळाकडून राज्य सरकारला पत्र लिहीत बैठकीचं आयोजन करण्याची मागणी
संपामुळे एसटीचे जवळपास ३५ डेपो बंद झाल्याची माहिती
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गणेशोत्सवानंतर निर्णय होणार
महाविकास आघाडीच्या जागावाटप संदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार, मुंबईच्या रखडलेल्या जागावाटपसंदर्भात आता गणेशोत्सवानंतर निर्णय होणार
महाविकास आघाडीच्या जागावाटपसंदर्भातील दोन बैठका झाल्यानंतर आता पुढील बैठका या गणेशोत्सवानंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे,
गणेशोत्सव झाल्यानंतर सुरुवातीला मुंबईतील जागावाटपा संदर्भात निर्णय घेतला जाणार असून त्यानंतर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील जागा वाटप बाबत निर्णय घेतला जाणार आहे
महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका जरी गणेशोत्सवानंतर होणार असल्या तरी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांच्या अंतर्गत बैठका या यादरम्यान होत राहतील, त्यासोबत प्रचाराची रणनीती सुद्धा ठरवतील
ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्ष पक्षांतर्गत सर्वे, जागा वाटपापूर्वी पक्षाकडून तयार करण्यात आलेले अहवाल, महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात आपली ताकद आहे, शिवाय कोणते इच्छुक उमेदवार आहेत, कोणत्या जागा संदर्भात आपण आग्रही असले पाहिजे,या सगळ्या बाबत पक्षांतर्गत चर्चा करतील अशी माहिती देण्यात आली आहे