Maharashtra Breaking 22nd July LIVE Updates: जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही; केंद्र सरकारची लेखी उत्तरात माहिती
Maharashtra Breaking 22nd July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking 22nd July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुंबईत आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
2. पालघर जिल्ह्याला आजपासून तीन दिवस यलो अलर्ट, गेले चार दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर. धामणी धरण 53टक्के भरले
3. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश
4. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु ठेवा, नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरु नये, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना
5. नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे, मनोरमा खेडकर यांची रवानगी येरवडा कारागृहात होईल. न्यायालयाने आज मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी यांची सुटका व्हावी यासाठी तात्काळ जामीन अर्ज दाखल केला होता. दरम्यान, शेतकऱ्यांना पिस्तूल घेऊन धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे, मनोरमा खेडेकर या वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री आहेत.
त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन येणाऱ्या मामा- भाच्याचा भीषण अपघात
नाशिकच्या त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन येणाऱ्या मामा भाच्याचा दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुचाकीवर मामा भाचे त्र्यंबक राजाचं (Trimbakeshwar) दर्शन घेऊन घरी परत असताना महिरावणी गावाजवळ चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मामा - भाचा दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.























