Maharashtra Breaking News Live Updates : दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

Maharashtra breaking News Live Updates: आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 21 Nov 2024 03:07 PM
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार


याचिका सुनावणी योग्य नसल्याचं स्पष्ट करत निकाली काढली


25 लाखांची अनामत रक्कम भरून चार आठवड्यांत हरित लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश


सदानंद कदम यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी दिलेल्या आदेशांना दिलंय आव्हान

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या शाळेत पालकांचा गोंधळ, शाळेत घेत असलेल्या प्रार्थनेवर आक्षेप 

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या शाळेत पालकांचा गोंधळ 


शाळेत घेत असलेल्या प्रार्थनेवर आक्षेप 


जाधववाडी येथील शाळेतील प्रकार


शाळेसमोर नागरिकांची गर्दी


मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी

प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलेलं होतं,अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा गौप्यस्फोट

सोलापूर ब्रेकिंग 
---


महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, मी सुद्धा महाविकास आघाडीतून इच्छुक होतो पण मला ऐनवेळी तिकीट दिलं नाही 


प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलेलं होतं, पण त्यांनी जाहीर काल केलं 


हे आधीच जाहीर झाले असते तर कदाचित आणखी चांगले झालेत असते 


ठाकरे गटाकडून ज्या पद्धतीने टीका करण्यात येतेय किंवा आंदोलन होतंय हे बरोबर नाही, अशा पद्धतीने टीका करने संस्कृतीला धरून नाही 


सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांची प्रतिक्रिया 

महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवार यांना संपर्क सुरू - सूत्र 

महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवार यांना संपर्क सुरू - सूत्र 


बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून बंडखोर जे विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांसोबत फोनवरून चर्चा


महाविकास आघाडीच्यावतीने निकाला आधीच बंडखोर संपर्क सुरू - सूत्र

महाराष्ट्र - झारखंड विधानसभेनंतर भाजपत नव्या राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्तीच्या हालचाली सुरू 

नवी दिल्ली 


महाराष्ट्र - झारखंड विधानसभेनंतर भाजपत नव्या राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्तीच्या हालचाली सुरू 


भाजप मुख्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक 


संध्याकाळी पाच वाजता होणार बैठक 


राष्ट्रीय महासचिवांच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मार्गदर्शन करणार 


महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा होणार नाही 


आजच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा होणार

सिल्लोड मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 11.50 टक्के मतदान वाढलं

सिल्लोड मतदार संघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 11.50 टक्के मतदान वाढलं आहे..
2019 मध्ये सिल्लोड मतदारसंघात 68.56टक्के मतदान झालं होतं .2024 विधानसभा निवडणुकीत 80 टक्के मतदान झालं आहे.

भाजपच्या अंतर्गत बूथ लेवल एक्झिट पोलनुसार सत्ता महायुतीचीच

भाजपच्या अंतर्गत बूथ लेवल एग्जिट पोल मध्ये महायुती सत्तेत येणार असल्याचा दावा…



भाजपच्या बुथलेव्हल एक्झिट पोल नुसार…


महायुती १६४


महाविकास १००


इतरांना २४ जागा मिळतांना दिसत आहे.



महायुतीत 


भाजप १००


शिवसेना( शिंदे )४२


राष्ट्रवादी (अजित पवार) २२


तर महाविकास आघाडीत 


काँग्रेस ४०


शरद पवार ३५


उद्धव ठाकरे २५


जगाला मिळणार असल्याचा भाजपचा बूथ लेव्हल सर्व सांगत आहे .

हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकून उडवली कॉलर, मतदानानंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकून उडवली कॉलर


मतदानानंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष 


कागलच्या गैबी चौकात मुश्रीफ समर्थकांचा जल्लोष


कागल विधानसभा मतदार संघात 81.72 टक्के मतदान

पार्श्वभूमी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या मतदानानंतर एक्झिट पोलचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेगवेगळ्या संस्थांनी आपापल्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे निकाल दिले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण राज्याला निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. राज्यात जो-तो आपापल्या पद्धतीने निकालाचा अंदाज लावतो आहे. मात्र 23 नोव्हेंबर रोजीच नेमकी स्थिती स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी मतदानाची प्रक्रिया संपल्यानंर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे नेते मंडळी पुढील राजकीय वाटचालीसाठी विचारविनिमय करण्यासाठी एकत्र जमणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे नेतेही आपले पुढचे राजकीय डावपेच आखत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.