Maharashtra Breaking 20th June LIVE Updates: जुना पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको; अर्धा तासानंतर वाहतूक खुली
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Nanded News: प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा मिळतोय.नांदेड मध्ये देखील ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत.प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. नांदेड लातूर हा महामार्ग या ओबीसी बांधवांनी रोखून धरला आहे.नांदेडच्या माळाकोळी या गावाजवळ हे हे आंदोलन सुरू आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मागण्या तात्काळ शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी या ओबीसी बांधवांनी केलीय.
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्हात खरीप हंगामात भात आणि नाचणी ही पीक घेतली जातात. मात्र सध्या कोकणात म्हणावा तसा पाऊस पडलेला नसल्याने भात पेरणी केलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्हयात 63 हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. यासाठी लागणारी भाताची रोपांची 45 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जून महिन्यात सरासरी 63 टक्के सिंधुदुर्गात पाऊस झालेला आहे. ज्या शेतकर्यांनी भाताची रोप टाकली आहेत त्यांनी संरक्षित पाण्याचा वापर करून रोप वाचवावी. आजपासून सिंधुदुर्गात अधिक चांगल्या पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी चांगला पाऊस पडला आहे. सिंधुदुर्गात पडलेला पाऊस पाहता दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र याबाबत नेते अनभीज्ञ आहेत.
Mumbai News: पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण झाला असल्याचा दावा मुंबई महापालिका करत असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी दिसतीय. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आज वडाळा टीटी नाल्याची नालेसफाईची पाहणी करत मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल केली आहे. अनेक नाल्यांमध्ये सफाई झाली नसल्याचं रवी राजा यांनी सांगितले. त्यामुळे 240 कोटी रुपये खर्च कुठे करण्यात आला? नालेसफाई झाली की फक्त हात सफाई झाली? असा प्रश्न रवी राजा यांनी विचारला आहे
NEET Exam : नीट युजी परिक्षा पुन्हा एखदा घेण्यात यावी अशी मागणी धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी केली असुन या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान एनटीए ने मेडीकल एन्ट्रन्स एक्झाम चा रिझल्ट 14 जुनला जाहीर करणार अस जाहीर करुन दोन दिवसापूर्वी एॅन्सर की जाहीर करुन अचानक 4 जुन रोजी रिझल्ट जाहीर केला आहे तर दरम्यान यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची शक्यता असुन यापुर्वी नीट चा पेपर देखील फुटला होता असे प्रकार वारंवार घडत असुन किमान दोन वर्षे केलेल्या मेहनतीचा स्वप्नांचा चुराडा झाला आहे त्यामुळे याची सीबीआय मार्फत चौकशी करावी व नीट युजी परिक्षा परत एखदा घेवुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यात यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी हातांमध्ये NTA चा धिक्कार असो अशा आशयाचे फलक घेवुन जोरदार घोषणाबाजी केली. जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला दरम्यान ग्रेस मार्किंगमुळे आमचे कष्ट वाया गेले आहेत त्यामुळे आम्हाला आमचा हक्क पाहीजे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
Washim Rain Updates: वाशिममध्ये खरिपाच्या 60 टक्के पेरण्या आता पूर्ण झाल्यात. मात्र, कृषी विभागानं 80 मिमी पेक्षा अधिक पाउस पडल्या शिवाय पेरणी न करण्याच आवाहन केलं होत. मात्र, काही भागांत चांगला पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली असून 60 टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात.
Palghar Rain Updates: पालघर जिल्ह्यातील पालघर, मनोर, केळवे, सफाळे ,बोईसर या भागांत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झालाय. पालघर मनोर रोडवरील गोवाडे येथे सध्या रस्त्यावर पुराचे पाणी आले असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
Palghar Wadhwan Bandar: पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. हे महाकाय बंदर उभारण्यासाठी 76 हजार 200 कोटी इतका खर्च येणार आहे. त्याचा पहिला टप्पा 2029 मध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण देशातील सर्व बंदरांची जेवढी क्षमता आहे, त्याहून अधिक क्षमता एकट्या वाढवण बंदराची असणार आहे. जगातील टॉप 10 बंदरांमध्ये वाढवण बंदराचा समावेश होणार आहे. या बंदराला आतापर्यंत तीव्र विरोध स्थानिकांकडून करण्यात आला आहे. मात्र यंदा सर्व भागीदारांशी चर्चा केल्याचा दावा केंद्रानं केला आहे.
Prakash Ambedkar: ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलंच पाहिजे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकरांनी आज लक्ष्मण हाकेंची वडीगोद्री इथल्या उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
Pune-Mumbai Highway: वडगावमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यूमुखी झालेल्या महिला आणि जखमी झालेले शाळकरी विध्यार्थी याची गंभीर दखल घेऊन सर्व पक्षीय वडगावकर नागरिकांच्यावतीने जुन्या पुणे मुंबई महामार्गावर रास्ता रोको. IRB विभाग, MSRDC विभाग यांचे विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन. योग्य त्या उपाययोजना लवकर व्हाव्यात यासाठी सर्व वडगावकर नागरिक या आंदोलनामध्ये मोठया संख्येने उपस्थित, अर्धा तास वाहतूक ठप्प, योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, प्रशासनाच्या आश्वासनानंतर वाहतूक खुली.
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू असून, याचा परिणाम रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. तर मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले ओसंडून व्हायला सुरुवात झाली असून ठीकठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे.
नेते आनंदराव अडसूळ यांच्या पत्नी मंगला अडसूळ यांचे अल्पशा आजाराने सकाळी सात वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा संध्याकाळी 4:00 वाजता राहत्या घरून निघेल.
Dindori News LIVE Updates: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पोफळवाडे येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्री विरोधात महिला रणरागिणी संतप्त झाल्या. शेकडो संतप्त महिलांनी एकत्रित येत दिंडोरी बाजार समिती आवारापासून तर पोलीस ठाणे इथपर्यंत मोर्चा काढत थेट दिंडोरी पोलीस ठाणे गाठत अवैध दारू दुकान, करू विक्री बंद करावे अशी आग्रही मागणी केली. अवैध दारू दुकाने बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला.
Bhandara News Latest Updates: रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीचं निमंत्रण पंचायत समिती सदस्याला का दिलं नाही. या कारणावरून वाद घालून रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा इथं काल घडली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी पवन पाचघरे (30) यांनी नरेश ईश्वरकर यांच्याविरुद्ध रात्री उशिरा मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली. नरेश ईश्वरकर यांच्याकडून वैद्यकीय अधिकारी पाचघरे यांच्या जीवाला धोका असल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी ईश्वरकर यांच्या विरोधात भादंवी कलम 353, 332 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद सदस्यानं वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik News: शेकडो वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पालखी सोहळ्याला आजपासून प्रारंभ होणार आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरापासून नाथांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. या पालखी सोहळ्यात नाथ संस्थानच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन केले जाते यंदाही या पालखीत सव्वा लाख वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी होती. आज त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरात पहाटेपासूनच नित्यनेमाची पूजा विधि संपन्न झाली त्यासोबत काकडा आरती करून दर्शन सुरू झाले. नाथांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची सकाळपासूनच मंदिरात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. पालखी सोहळ्याचा रथ फुलांनी सजवत त्यात नाथांच्या पादुका घेऊन या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. पालखी सोहळ्याचे नेमके नियोजन कसे असते या संदर्भात मंदिराचे मुख्यपुजारी गोसावी महाराज यांनी अधिक माहिती दिली आहे.
Palghar News: पालघर: केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं महाराष्ट्रातील पालघरमधील महत्त्वाचा असलेलं वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर पालघरमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. वाढवण बंदराला मंजुरी दिल्याने पालघर जिल्ह्यात चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध होणार असून विकासाला चालना मिळेल असं मत डहाणूतील रवींद्र पाठक यांनी व्यक्त केला आहे.
National News: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी 19 जून रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी बैस यांनी प्रधानमंत्री मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा केली.
Westren Railway Updates: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून वाहतूक 30 ते 40 मिनिटं उशिरानं सुरू आहे. बोईसर-उमरोळीदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं रेल्वेचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक
30 ते 40 मिनिटं उशिरानं सुरू आहे.
Nashik Crime : नाशिक पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले, नाशिकच्या भारत नगर परिसरात धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून. काल रात्री 12 वाजेच्या सुमारास आपपसात झालेल्या वादानंतर धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. परवेज आयुब शेख (वय 30) असे मयत इसमाचे नाव असून तो मुंबई नाका परिसरातील भारत नगर येथील रहिवाशी होता. मयत आणि मारेकरी दोघे एकमेकांचे मित्र असल्याची माहिती, मोबाईल विक्री देणे घेणे वरून वाद झाल्याने झालेल्या हाणामारीत खून झाल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित मारेकरी इब्राहिम सय्यद याला ताब्यात घेतले असून दोघे फरार असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची चौकशी करून मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nandurbar News: शहादा तालुक्यातील कळंबू शिवारात एका शेतात असलेल्या 50 फूट खोल विहिरीत दोन तरसची पिल्लं पडल्याचं शेतकऱ्यांचा लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना वन विभागाला याबाबतची माहिती दिली होती गेल्या दोन दिवसापासून या परिसरांमध्ये पाच ते सहा तरस फिरत असल्याने त्यांच्या या भागात वावर पडला होता त्यातच काल रात्री हे तरसचे पिल्ले त्या 50 फूट खोल विहिरीत पडले वनविभागाने प्रयत्नाने अखेर तीन तासानंतर या पिल्लांना विहिरीतून सुरक्षित रित्या बाहेर काढला असून त्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना औषध उपचार करण्यात आला आहे कळंबू शिवरात गेल्या अनेक दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण आहे.
Nashik Graduated Election : नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार एडवोकेट संदीप गुळवे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील जाऊन आपला प्रचार करत असून ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांसोबत त्यांनी संवाद साधला असून जुनी पेन्शन योजना शिक्षकांची पदोन्नती रखडलेली शिक्षण भरती या संदर्भातील अनेक समस्यांवर त्यांनी धडगाव तालुक्यातील अनेक शिक्षकांनी सोबत चर्चा केली असून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी विधानपरिषद आवाज उठवणार असल्याचेही उमेदवार ॲड संदीप गुळवे यांनी सांगितला.
Shiva Rajyabhishek Ceremony: आज रायगडावर 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, गडावर मोठ्या स्वरूपात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पावसाची रिमझीम एकीकडे सुरु असून तेवढ्याच उत्साहात शिवभक्त मात्र गडावर दाखल होताना दिसत आहेत.
Minimum Support Prices For 14 Kharif Crops Increased: खरीपाच्या 14 पिकांच्या हमीभावात वाढ. कपाशीच्या हमीभावात 501 रुपयांची वाढ. धानाच्या एमएसपीत 117 रुपयांची वाढ. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
खरीपाच्या 14 पिकांच्या हमीभावात वाढ. कपाशीच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ. धानाच्या एमएसपीत ११७ रुपयांची वाढ. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -