Maharashtra News Live Updates : पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना, हडपसरमध्ये मगरपट्टा परिसरात भीमाशंकर सोसायटीत आग
Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2025) पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष पूर्ण ताकदीने प्रचाराला लागले आहेत. या पक्षांचे महत्त्वाचे नेते रोज तीन ते चार सभा घेऊन जास्तीत जास्त लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेतेमंडळी आकर्षक अशी आश्वासनं देत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची असल्याने या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील नेतेही येथे सभा घेत आहेत. प्रचारादरम्यान, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या प्रमुख घडामोडींसह तरही राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना, हडपसरमध्ये मगरपट्टा परिसरात भीमाशंकर सोसायटीत आग
पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना
हडपसर मध्ये मगरपट्टा परिसरात भीमाशंकर सोसायटीला लागली आहे
तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये आगीची घटना
आगीचं कारण स्पष्ट
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल आग विझवण्याचे काम सुरू
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबेंसाठी राजनाथ सिंह मैदानात
वसई विधानसभेसाठी राजनाथ सिंह यांची जाहीर सभा
वसईतील कालिका मंदिर परिसरात राजनाथ सिंह यांची तोफ धडाडणार
उत्तर भारतीय मतांसाठी भाजपची रणनीती























