एक्स्प्लोर

Maharashtra Breaking 14th June LIVE Updates: फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking 14th June LIVE Updates: फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली

Background

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये झटपट घेता येईल... 

नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकरण; बड्या काँग्रेस नेत्याचं नाव समोर

Nagpur Purushottam Puttewar Murder Case: नागपूर : पुणे पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच आता नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणातही दिवसागणिक नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. नागपूरच्या (Nagpur News) पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणात (Purushottam Puttewar Murder Case) गडचिरोलीच्या (Gadchiroli) देसाईगंज येथील एका काँग्रेस (Congress) नेत्याचं नाव पुढे येत आहे. आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याचा माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे. 

बकरी ईद निमित्त कुर्बानीची परवानगी देणाऱ्या पालिकेला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : बकरी ईद (Bakrid 2024) निमित्त कुर्बानीची परवानगी देणाऱ्या पालिकेला (BMC) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. बीएमसीनं याबाबत 29 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला विरोध करत हायकोर्टात आलेल्या जीव मैत्री ट्रस्टला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे. मात्र, कुठल्याही रहिवासी इमारतीत कत्तलीला परवानगी नाही. देवनार व्यतिरिक्त पालिकेनं परवानगी दिलेल्या 114 जागांवरच कत्तलीची परवानगी बकरी ईद निमित्त 17 ते 19 जून दरम्यान ही परवानगी 47 पालिका मंडई आणि 67 खासगी मटन शॉपवर परवानगी लागू राहील.

22:54 PM (IST)  •  14 Jun 2024

Jaiprakash Mundada : जयप्रकाश मुंदडा यांचा अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics : जयप्रकाश मुंदडा यांचा अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंदडा यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

संपर्कप्रमुख आनंदराव जाधव आणि राजू चापके यांच्या उपस्थितीत 

जयप्रकाश मुंदडा हे माजी सहकार मंत्री ठाकरे गटाचे हिंगोलीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळख

लोकसभेचे उमेदवारी न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या वर नाराज होते शिवाय उद्धव ठाकरे भेटत नसल्याची खंत सुद्धा त्यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केली होती

22:52 PM (IST)  •  14 Jun 2024

Nanded Rain : पाऊस लांबल्याने बी बियाने आणि खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी फिरवली पाठ.नवीन मोंढा बाजारात शुकशुकाट.

नांदेड : मृग नक्षत्रला सुरुवात झाली असली तरी नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मान्सूनचे आगमन नांदेड जिल्ह्यात झाले. परंतु जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाली नाहीये. जिल्ह्यात आता पर्यंत 30 पूर्णांक 10 मिलीमीटर इतक्या कमी पावसाची नोंद झालीय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी बी बियाणे आणि खते  खरेदी करण्याकडे बी बियाणे बाजाराकडे  पाठ फिरवल्याचे दिसून येतं आहे. दरवर्षी या दिवसात नांदेडच्या नवीन मोंढा बाजारात शेतकऱ्याची खरेदीसाठी मोठी गर्दी असायची. मात्र यंदा पाऊस लांबल्याने शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

22:49 PM (IST)  •  14 Jun 2024

Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली

Shivaji Maharaj Bakhar in France : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संसोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. 'नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स'मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तकं चाळत असताना या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे.

22:46 PM (IST)  •  14 Jun 2024

Amravati News : चायना मांजाने दुचाकीस्वार युवकाचा गळा कापला, जागीच मृत्यू...

अमरावती : अकोला येथील शुभम बिल्लेवार (वय 35) अकोल्यावरून अंजनगाव याठिकाणी कुटुंबातील लग्न सोहळा आटोपून परत जाताना वडुरा फाट्यावरील ब्रिजवर अचानक चायना मांजा आल्याने शुभम बिल्लेवार या युवकाचा गळा कापल्या गेला. जखम मोठी असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

20:23 PM (IST)  •  14 Jun 2024

Beed Rain : बीड पिंपळनेर रस्ता बंद

बीड : बीड शहराजवळील पिंपळनेर परिसरामध्ये आज सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली दीड ते दोन तास झालेल्या पावसाने परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं. मृग नक्षत्राच्या आगमनालाच पाऊस आणि सुरुवात केल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस या परिसरात झाला आणि या पावसामुळे मनकर्णिका नदीला पाणी आले आहे. नदीला पाणी आल्याने बीड पिंपळनेर हा रस्ता काही काळ बंद राहणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget