Maharashtra Breaking LIVE Updates: ...म्हणून आज या देशातील शेतकऱ्यांना जीव द्यायची वेळ आलेली आहे - शरद पवार
Maharashtra Breaking 11th August 2024 LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking 11th August 2024 LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Solapur : बार्शीत शरद पवारांना माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी बांधली राखी
Solapur : बार्शीत शरद पवारांना माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी बांधली राखी
शेतकरी मेळव्याच्या निमित्तने बार्शीत आलेल्या शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकारी माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची घेतली भेट
यावेळी प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधून औक्षण करत केले स्वागत
प्रभावती झाडबुके यांनी 1962 ते 1972 या काळात विधानसभेत बार्शी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते
आज भाषणात ही शरद पवार यांनी झाडबुके यांचा उल्लेख केला होता
Solapur : सोलापूरात शरद पवार हे माजी मंत्री आणि जुने सहकारी दिलीप सोपल यांच्या भेटीला
Solapur : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार हे माजी मंत्री आणि जुने सहकारी दिलीप सोपल यांच्या भेटीला
शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने बार्शी दौऱ्यावर असेलेल्या शरद पवार हे माजी मंत्री दिलीप सोपल निवासस्थानी पोहोचले
तर शरद पवारांच्या भेटीसाठी दिलीप सोपल यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित
पवारांच्या सोबत विजयसिंह मोहिते पाटिल, खासदार धैर्यशील मोहिते पाटिल हे देखील उपस्थित
दिलीप सोपल हे अनेक वर्ष शरद पवार यांचे सहकारी राहिलेत मात्र मागील विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला























