Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates: आजपासून बारावीच्या बोर्डाची परिक्षा सुरु होणार आहे. तर आज महाराष्ट्राची कॅबिनेट बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स

मुकेश चव्हाण Last Updated: 11 Feb 2025 02:15 PM
नालासोपा-यात 'त्या' 41 अनधिकृत इमारतीवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाही

नालासोपारा : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 23 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून, उर्वरित 18 इमारतींवर पुन्हा कारवाई सुरु  आहे. या मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासनाने अनधिकृत बांधकामांना कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नालासोपा-यात 'त्या' 41 अनधिकृत इमारतीवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाही

नालासोपारा : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 23 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून, उर्वरित 18 इमारतींवर पुन्हा कारवाई सुरु  आहे. या मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासनाने अनधिकृत बांधकामांना कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दारू आणि बियर बॉटल्सच्या विळख्यात विद्यार्थ्यांना द्यावी लागतेय बारावीची परीक्षा

बुलढाणा: विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असलेली बारावीची परीक्षा चक्क विद्यार्थ्यांना दारू आणि बियर च्या बॉटलच्या विळख्यात बसून द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर आज बघायला मिळाला. आणि त्यामुळे संतप्त पालकांनी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध नोंदवला. जिल्हा परिषदेच्या या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले बाक स्वच्छ नव्हते तर परीक्षा केंद्रावर वॉशरूम व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही नव्हती आणि त्यामुळे पालकांनी या ठिकाणी संताप व्यक्त केला आहे.

दारू आणि बियर बॉटल्सच्या विळख्यात विद्यार्थ्यांना द्यावी लागतेय बारावीची परीक्षा

बुलढाणा: विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असलेली बारावीची परीक्षा चक्क विद्यार्थ्यांना दारू आणि बियर च्या बॉटलच्या विळख्यात बसून द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर आज बघायला मिळाला. आणि त्यामुळे संतप्त पालकांनी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध नोंदवला. जिल्हा परिषदेच्या या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले बाक स्वच्छ नव्हते तर परीक्षा केंद्रावर वॉशरूम व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही नव्हती आणि त्यामुळे पालकांनी या ठिकाणी संताप व्यक्त केला आहे.

मुंबईच्या वांद्रे परिसरात ज्येष्ठ महिला नागरिकाची हत्या, दोन तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

मुंबईच्या वांद्रे परिसरात ज्येष्ठ महिला नागरिकाची हत्या 


रिक्लेमेशन परिसरातील इमारतीत राहणाऱ्या रेखा खोंडे हिचा हात बांधून गळा कापून केली हत्या 


 ज्येष्ठ महिला नागरिकांची हत्या झाल्याने वांद्रे परिसरात खळबळ


पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या


परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वांद्रे पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

प्रेम प्रकरणातून 35 वर्षीय इसमाची निघृण हत्या; वाशिममधील घटना

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चांड्स गावाजवळ नागपूर संभाजीनगर जुन्या मार्गावर एका तरुणाच प्रेत सापडल्याची घटना  दोन दिवसा पूर्वी घडली होती..मात्र ,या तरुणांची  एका विवाहित महिलेच्या प्रेम जुळल्याने हत्या झाल्याचं समोर आलंय... मृत तरुणाचं नाव रुपेश हाडे असून  रिसोड तालुक्यातील गोहगाव गावातील एका एका २७ वर्षीय या विवाहीत तरुणीचे गेल्या वर्षाभरा पासून प्रेम संबध जुळलेले होते..या बाबत त्या महिलेच्या पतीला कुणकुण लागताच  माहेरी असलेल्या पत्नीला भेटी साठी रुपेश गेला असता ..रुपेशला  काही लोकांना मारहाण करून हत्या केल्याची तक्रार शिरपूर पोलीस स्टेशनला मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून 8 जणांवर शिरपूर पोलिसांनी गुन्हा नोंदविलाया प्रकरणी 5 आरोपी अटकेत असून  घटनेचा तपास पोलीस करत आहे.

परळी जवळील शिरसाळा येथे दोन गट आपापसात भिडले; हाणामारी दरम्यान बुलेट पेटवली

Beed News: बीडच्या परळी जवळील शिरसाळा येथे दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये एक बुलेट गाडी पेटविण्यात आलीय. या प्रकरणात परस्परविरोधी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


परळी तालुक्यातील शिरसाळा येथे आठवडी बाजारात दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेतील एका गटाने बुलेट पेटवली, विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपचे चालक सैफ सलीम कुरेशी यांना पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे.. अशी धमकी दिली.. या नंतर वाद घातल्यानंतर दोन गट आपापसात भिडले..


यादरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटविण्यात आली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस गुन्हेगारीवर जरब बसवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होतेय.

कोळसा घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला आग 

गडचिरोली : जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा नजीक मध्यरात्री छत्तीसगड येथून चंद्रपूरकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. चालकला ही बाब लक्षात येताच ट्रक रस्त्याच्या कडेला लावून ते खाली उतरले. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशामक वाहनाने आग विझविण्याकरिता आटोकाट प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत ट्रकचे खूप नुकसान झाले होते. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट किंवा टायर फुटल्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शालेय शिक्षण राज्यमंत्री पकंज भोयर यांनी दिली बारावीच्या परीक्षा केंद्रावर भेट

बुलढाणा : राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय मस्कुजी बिरुजी बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांनी भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली. भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले असता त्यांनी ही आकस्मिक भेट दिली. भोयर यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियाना संदर्भात माध्यमांची बोलताना माहिती दिली.

महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नी कुटुंबासोबत पोलीस अधीक्षक भेटीसाठी रवाना

व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नी कुटुंबासोबत पोलीस अधीक्षक भेटीसाठी रवाना


परळीतील महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती याला पंधरा महिने उलटून गेले आहेत अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत 


आरोपींना तात्काळ ताब्यात घ्या व आमच्या कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या मुलासोबत पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत 


 


मी माझ्या मागणीवर ठाम असून दहा दिवसाचा वेळ पोलीस अधीक्षक यांना देणार आहे त्यानंतर मी माझ्या कुटुंबासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे 



सुरेश दशांच्या मागणी नंतर पंधरा महिने उलटून गेले तरी अजूनही आरोपीचा शोध लागत नाहीये आणखीन किती दिवस द्यायचे तरी मी आज पोलीस अधीक्षक यांना दहा दिवसाचा वेळ देणार आहे त्यानंतर मी कुटुंबासोबत आम्हाला उपोषण करणार आहे

नंदूरबारमध्ये 17 हजार 611 विद्यार्थी देणार 12 चा पहिला पेपर

नंदूरबार जिल्ह्यातील एकूण 17 हजार 611 विद्यार्थी देणार 12 चा पहिला पेपर.....


जिह्यातील 28 केंद्रांवर होणार इंग्रजी भाषेचा पहिला पेपर..



Nandurbar News: आज पासून 12 वी च्या परीक्षांना सुरवात होत असून पहिला पेपर हा इंग्रजी भाषेचा असणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील 28 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून 17 हजार 611 विद्यार्थी आज पेपर देणार आहे.28 केंद्रापैकी 6 केंद्र हे संवेदनशील केंद्र असून या केंद्रांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.. विद्यार्थीसाठी आवश्यक सुविधा असणार आहे परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रॉन आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासोबतच व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे.परीक्षा केंद्राचा 100 मीटर आणि 500 मीटर अंतराव झेरॉक्स सायबर कॅफे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत...
परीक्षा काळात गैरप्रकारात संस्थाचालकांच्या हस्तक्षेप आढळून आल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिले आहेत....

दुचाकी खड्ड्यात आदळली आणि महिलेचा हात फ्रॅक्चर, उल्हासनगरात अपघात 

उल्हासनगरात रस्ता खोदल्याने दुचाकीचा स्वराचा स्तोल जाऊन अपघात 


उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील रस्त्यावरील घटना


घटना cctv कॅमेऱ्यात कैद 


उल्हासनगरमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत ड्रेनेजचे काम झाले तरीही ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती केली नाही या खोदलेल्या रस्त्यांमुळे उल्हासनगर तीन मधील रस्त्यावर दररोज मोटरसायकस्वरांचा अपघात होत आहे एक अपघात cctv  कॅमेऱ्यात कैद झाला आहे खड्ड्यात दुचाकी आदळल्याने मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचा  या घटनेत हात फॅक्चर झाला आहे 
उल्हासनगर कॅम्प नंबर तीन च्या तीलसन हॉटेल रस्त्यावर ही घटना घडली आहे.
 उल्हासनगर शहरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी संपूर्ण रस्ते खोदलेले आहेत,परंतु संबंधित ठेकेदार रस्ते दुरुस्ती करत नसल्याने
  दररोज अपघात होत आहे,

राज्याच्या आरोग्य विभागात धक्कादायक प्रकार, बनावट कागदपत्रे दाखवून निविदा मिळवल्या

राज्याच्या आरोग्य विभागात खोटी व बनावट शासकिय कागदपत्रे सादर करून निविदा प्राप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर


आंतररुग्णांना आहार पुरवठा पुरवण्याच्या निविदा प्राप्त करण्यासाठी खोटे व बनावट शासकिय कागदपत्रे आरोग्य भवन या शासकिय कार्यालयात सादर केली


या बनावट कागदपत्रांच्या आधारे निविदा मिळवून  शासनाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल


दिलीप म्हत्रे, संगिता दशपुते, जनार्दन चांदने या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत

पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढलं, GBS रुग्ण वाढताना पुणे विद्यापीठात किळसवाणा प्रकार

पुणे विद्यापीठात पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढण्याचा प्रकार?


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅन्टीन मधील व्हिडिओ आला समोर


पुण्यात जी बी एस रुग्णांची संख्या वाढत चालली असताना किळसवाणा व्हिडिओ आला समोर


विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?


विद्यापीठातील आदर्श कॅन्टीन मध्ये एक कर्मचारी  पिण्याच्या पाण्याच्या कुलर मध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढतो आहे असा व्हिडिओ आता समोर आला आहे


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये असलेल्या कॅन्टीन , मेस व उपहारगृहात जेवणामध्ये आळी , झुरळे  निघण्याच्या  घडत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप


काल विद्यापीठातील वसतीगृहात विद्यार्थ्यांना  उंदीर चावलायची घटना घडली होती

ग्रामीण कला संस्कृती जपण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामीण कला संस्कृती जपण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार 


११ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी असे १२ दिवस हे प्रदर्शन असणार 


या प्रदर्शनात ५०० पेक्षा अधिक महिला बचत गटांचे स्टॉल्स


मुंबई, नवी मुंबई, नागपूर याठिकाणी महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरविण्यात आलं आहे

बोर्डाच्या परीक्षेची तयारी झाली, कोल्हापुरात 178 केंद्रावर भौतिक सुविधांची खात्री

आज पासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे...कोल्हापूर विभागात 176 केंद्रांवर ही परीक्षा होत आहे... त्यामुळे वेळेत पालक आपल्या पाल्यांना घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत... विभागीय मंडळाकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे... सातारा जिल्ह्यातून 34 हजार 576, सांगली 32 हजार 830, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हजार 826, असे सुमारे 1 लाख 18 हजार 232 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत... संवेदनशील केंद्र परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे निगराणी केली जाणार आहे... परीक्षा सुरू होण्याअगोदर केंद्रांवरील भौतिक सुविधांची खात्री प्रशासनाकडून करण्यात आलीय... परीक्षा केंद्रांबाहेर व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे....

राहूल सोलापूरकरच्या निवासथानाबाहेर आंदोलन होण्याची शक्यता, पोलीस बंदाेबस्त वाढला

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर वादात सापडले आहेत. आजही राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे,

शरद पवारांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुरस्कारसोहळा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पुरस्कार मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार असला तरीही राजकीय वर्तुळात शिंदे - पवार एकत्र मंचावर बसण्याला वेगळे महत्व आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर सर्वाधिक नुकसान शिंदे आणि शरद पवारांचे झालेले दिसते. त्याच दोन नेत्यांनी एकत्र मंचावर येण्याने नेमका काय मेसेज घ्यायचा हा कळीचा प्रश्न ठरतो आहे

पालघरमध्ये केमिकल गोडाऊनला भीषण आग, नागरिकांच्या जीवाशी खेळ

पालघर - अमृत रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या केमिकल गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग .


बोईसरच्या सरावली ग्रामपंचायत मधील अमृत रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या केमिकल गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग . घातक केमिकलची विल्हेवाट लावता न आल्याने केमिकल माफीयांनीच आग लावल्याचा प्रकार . आगीमुळे अमृत रेसिडेन्सी सह परिसरात राहणारे नागरिक त्रस्त . सरावली ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीररित्या घातक केमिकलची साठवणूक केली जात असलेल्या गोडाऊनला आग . अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांना पहाटे उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश . बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल माफीयांचा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळ .

इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात मोठी बातमी, मुंबई पोलिसांनी समय रैनासह साधाला कलाकारांशी संपर्क

इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात मोठी बातमी


मुंबई पोलिसांनी समय रैना, रणवीर इलाहाबादिया यांच्याशी संपर्क साधला.


इंडियाज गॉट टॅलेंट वाद प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी पोलिसांनी त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले.

12 बाेर्डाच्या विद्यार्थ्यांंचं सोलापुरात ढोल ताशासह गुलाबपुष्प देऊन स्वागत

राज्यभरात आजपासून 12 विच्या परीक्षाना सुरुवात 


सोलापुरात परीक्षात्री विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात स्वागत 


राज्यात सुमारे 15 लाख विद्यार्थी 12 वीच्या परीक्षाना सामोरे जातायत 


तर सोलापूर जिल्ह्यातील 55 हजार विद्यार्थी 12 वीच्या परीक्षा देणारं आहेत 


आज पहिला पेपर इंग्रजीचा असून विद्यार्थ्यांच्या मनात काहीसं दडपण असलं तरी वर्षभर केलेल्या तयारीमुळे उत्साह देखील आहे


परीक्षा केंद्रावर कोणत्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडू नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय 


दरम्यान विद्यार्थीच्या जरी परीक्षा असली तरी वर्ष भर पालकांची देखील एकप्रकारे ही परीक्षाचं असते 


पालकांची कसरत वर्षभर कशी राहिली, त्यांनी कशा पद्धतीने परीक्षा पार पाडण्यासाठी तयारी केलीय 

आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात, पुण्यात परीक्षेला आलेल्या मुलांचे गुलाब देऊन स्वागत

पुण्यातील गरवारे महाविद्यालयात गुलाब देऊन मुलांचं स्वागत करण्यात आल
 


राज्यात १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा 


८ लाख १० हजार ३४७ मुले , ६ लाख ९४ हजार ९५२ मुली तर ३७ तृतीयपंथी विद्यार्थी देणार परीक्षा 


राज्यातील एकूण ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा 


कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती तर संवेदनशील केंद्रावर ड्रोनद्वारे निगराणी

बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात तिकडे पाथर्डीतल्या अनोख्या बॅनरबाजीची एकच चर्चा

Ahilyanagar: बारावीच्या परीक्षा आजपासून  सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरातील अनेक चौकात "पाथर्डीकर जागे व्हा, कॉपी प्रकरणाला पाठबळ देणाऱ्यांचा निषेध करा"  या आशयाचे बॅनर अज्ञात समाज सेवकांनी लावले आहेत.... हे फलक शिक्षण विभागात चर्चेचा विषय ठरले आहे... इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षेच्या तोंडावर हे फलक शिक्षण विभागाला आणि पाथर्डीकरांना कॉ मुक्तीसाठी साद घालणारी ठरत आहे...अज्ञातांनी लावलेले बॅनर एक प्रकारे पाथर्डी तालुक्यात दरवर्षी होत असलेल्या कॉपी प्रकरणावर शिक्कामोर्तबच करत आहेत... तालुक्यातील काही विद्यालयात सर्रासपणे चालत असलेल्या कॉपी प्रकरणामुळे तालुक्याचे नाव बदनाम  झाले आहे... तुमच्या पाल्याला आमच्या विद्यालयात ऍडमिशन द्या हमखास चांगल्या मार्कानी पास करून देण्याची हमी देत काही संस्थाचालकांनी आजपर्यंत लाखो रुपयांचा धंदा केला आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

- नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी शहर पोलिसांची मोठी कारवाई...


- येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात शांतता अभाधित राहावी यासाठी गंभीर गुन्हेगारांवर थेट हद्दपारची कारवाई...


- नाशिक परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील आठ गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांनी केली हद्दपारची कारवाई...


- नाशिक शहरातील अंबड, इंदिरानगर, उपनगर आणि नाशिक रोड या भागात सर्वाधिक गुन्हेगारीचा उच्छाद...


- पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ दोन उपायुक्त मोनिका राऊत यांनी केली कारवाई...

गोंदिया जिल्ह्यात 18 हजार 794 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. गोंदिया जिल्ह्यात 78 केंद्र असून 18 हजार 794 विद्यार्थी हे बारावीची परीक्षा देणार आहेत. तर यावर्षी कॉपीमुक्त अभियान शिक्षण विभाग कडून राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभाग महसूल विभाग व पोलीस विभागाकडून बंदोबस्त करण्यात आले आहे. तर शिक्षण विभागाचे 7 फ्लाईंग स्कॉट तसेच महसूल विभागाचे देखील स्लाइंग स्कॉट असून बैठक पथक ही तयार करण्यात आले आहे. तर पोलीस विभागाकडूनही कॉपीमुक्त अभियानासाठी तयारी करण्यात आली आहे.. अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी दिली आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या योजनांच आज सादरीकरण

केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या योजनांच आज सादरीकरण


मंत्रिमंडळ बैठकीत होणार सादरीकरण


केंद्राने राज्यात कोणकोणत्या योजना आणि किती निधी दिलाय या संदर्भात होणार सादरीकरण


त्यानंतर राज्यातील योजनेचा निधी आणि केंद्रातील निधी मिळून योजना तयार केली जाणार


राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना केंद्राच्या निधीचा राज्याच्या योजनांना हातभार लागणार

नाशिकचा कश्यपी धरणावर प्रकल्पग्रस्तांच आंदोलन 

- नाशिकचा कश्यपी धरणावर प्रकल्पग्रस्तांच आंदोलन 


- धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे जलसमाधी आंदोलनाचा इशारा 
- शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात
- काही शेतकऱ्यांना पोलिसांनी आंदोलन होण्यापूर्वीच घेतले ताब्यात
- धरणाच्या प्रवेशद्वारवर ग्रामस्थांचा ठिय्या
- धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, कुटुंबातील एका सदस्याला महापालिका मध्ये नोकरी देण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप

डाॅलरच्या तुलनेत रुपया आज मजबूत 

डाॅलरच्या तुलनेत रुपया आज मजबूत 


डाॅलरच्या तुलनेत रुपया ८७.३५ वर उघडला 


सोमवारी रुपया ८७.४८ वर बंद झाला होता 


एकवेळ अशी होती की रुपया ८८ ची मजल पार करतो असा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र आज रुपया मजबूत झाल्याचं दिसतंय

तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी नोंदवला जबाब

तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी नोंदवला जबाब


काल पुणे विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला


खरंच घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाले होते का?


बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी केले होते विमानाचे बुकिंग


६८ लाख रुपये देऊन एका खाजगी विमानाने सावंत यांचे चिरंजीव निघाले होते बँकॉक ला


नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सुद्धा पोलिस करण्याची शक्यता


तानाजी सावंत यांना त्यांचा मुलगा बँकॉकला गेलाय हे माहिती होतं?

पुण्यात रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पुणे पोलिसांचा इंगा 

पुण्यात रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पुणे पोलिसांचा इंगा 


जामिनावर बाहेर येत दहशत पसरवणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी काढलेली धिंड


रेकॉर्डवरील आरोपींना धडा शिकवण्यासाठी ज्या परिसरात दहशत करण्याचा केला प्रयत्न त्याच परिसरात पुणे पोलिसांनी काढली धिंड 


सदर गुन्ह्यातील आरोपीनी येरवडा परिसरात हातात तलवारी घेत दहशत माजवण्याचा होता प्रयत्न


येरवडा पोलिसांची कारवाई 


प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे, प्रथमेश संजय राठोड, बाबा भानुदास गवळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे


पुण्यातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

सोलापूर शहरात वाहतूक पोलिसांनी दुचाकी वाहन चालकावर कारवाई

सोलापूर शहरात वाहतूक पोलिसांनी दुचाकी वाहन चालकावर कारवाई केलीय. कानाला कानठाळ्या बसणारे सायलेन्सर असलेल्या गाड्यावर शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई केली. या दीड महिन्यात 523 मॅडिफाइड सायलेन्सरवर कारवाई करत साडेपाच लाख रुपयांचा वाहतूक पोलिसांनी दंड वसुल केलंय. तर फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या 1366 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केलीय. या कारवाईच्या वेळी पोलीस आणि वाहन चालकत खटके उडताना दिसतायत. सात रस्ता परिसरात पोलीस कारवाई दरम्यान वाहन चालक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करताना बुलेट चालकाने पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला. बराच वेळ हा वाद सुरु होता मात्र पोलिसांनी अखेर वाद घालणाऱ्या बुलेट चालकाची बुलेट जप्त केली.

नाशिक जिल्ह्यातील 125 केंद्रावर परिक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरवात होत आहे. नाशिक जिल्ह्यातील 125 केंद्रावर परिक्षा घेतली जात असून 78 हजार 123 विद्यार्थी प्रविष्ट आहेत, त्यापैकी सर्वाधिक 40 हजार 528 परीक्षार्थी विज्ञान शाखेतील आहेत, 24 हजार 179 कला , 11 हजार 815 विद्यार्थी वाणिज्य शाखेचे आहेत. आज पासून 18 मार्च पर्यत म्हणजेच38 दिवस परीक्षा सुरू राहणार असून 6भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर अचानकपणे पाहणी केली जाणार आहे, विद्यार्थ्यांनी गौरमार्गाचा वापर करू नये असे शिक्षण विभागच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत

इंडियन ऑईलच्या डेपोतून पेट्रोल आणि डिझेलची बिनबोभाटपणे चोरी

अकोला जिल्ह्यातील गायगाव येथील इंडियन ऑईलच्या डेपोतून पेट्रोल आणि डिझेलची बिनबोभाटपणे चोरी. अतिशय उच्च सुरक्षा असलेल्या डेपोतील चोरीचा व्हिडिओ 'माझा'च्या हाती. गायगाव येथील ऑइल डेपो हा अतिसुरक्षित परिसर. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून डेपोमध्ये पेट्रोल आणि डिझेल चोरीचा प्रकार सर्रासपणे सुरू. पेट्रोल आणि डिझेल चोरणारे अनेक टोळ्या डेपोमध्ये दिपूच्या आतील रेल्वे वॅगन आणि डेपोच्या बाहेरील पेट्रोल डिझेल टँकर मधून होते चोरी. तुरीसाठी मोठ्या काना आणि पाईपचा वापर. चोरी करणाऱ्या डोळ्यांकडे ऑइल डेपो प्रशासन आणि उरळ पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष.

नाशिक जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत खते, बियाणे आणि किटकनाशक भेसळीत कृषी विभागाने केली मोठी कारवाई

- नाशिक जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत खते, बियाणे आणि किटकनाशक भेसळीत कृषी विभागाने केली मोठी कारवाई...


- नऊ महिन्यांत 62 परवानांचे निलंबन तर 5 परवाने रद्दची कारवाई... तर ५ परवानाधारकांवर पोलिसात गुन्हे दाखल


- कृषी विभागाच्या माध्यमातून गुणवत्ता तपासणीनंतर जिल्ह्यातील परवानाधारकांवर करण्यात आली कठोर कारवाई...


- शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणि भरारी पथकाच्या तपासणीनंतर कृषी विभागाची कारवाई


- नमुने तपासणी नंतर गुण नियंत्रण विभागाने बियाण्यांच्या, खत आणि कीटकनाशकांची करण्यात आली होती तपासणी...


- कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण 128 तक्रारी कृषी विभागाला प्राप्त, कृषी विभागाकडून पंचनामा करून अहवाल सादर 


- वारंवार बियाणे, खते आणि औषधांमध्ये होणाऱ्या भेसळीनंतर नाशिक कृषी विभागाची कारवाईची मोहीम वेगवान...

राजीनामा घेणे ही प्रथा काँग्रेस मध्ये चुकीची- अशोक चव्हाण

काँग्रेसच्या राजवटीत आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घतले त्यानंतरते  चौकशीला समोर गेले मात्र मात्र काँग्रेसची ही प्रथा खूप चुकीची राहिल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितले हे माझे व्यक्तिगत मत आहे तेव्हाही होतं आजही आहे काँग्रेसच्या काळात जे राजीनामे घेतले गेले ते कुठल्या आधारावर घेतले गेले विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेणे आरोप केले राजीनामे घ्यायची यात मी सुद्धा गेलेलो आहे राजकारणा पोटी कोनालाही बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचे सत्र हे काँग्रेसच्या काळामध्ये खूप चुकीचा आहे तसेच राजकारणात आरोप होतात प्रत्यारोप होतात हा राजकारणाचाच भाग आहे केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही निर्णय घेतलेले ते चुकीचे आहे राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम त्यावेळेला झालेला असल्याचा अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी संयम ठेवावा; मंत्री उदय सामंत यांचे आवाहन

ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; परंतु यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना संयम ठेवावा. गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज आहे, असेही उदय सामंत यांनी सांगितलेय.

विद्यार्थिनींनी पिझ्झा खाल्ला म्हणून वसतिगृहातून काढून टाकल्याचे वृत्त चुकीचे

पुणे : हवेली तालुक्यातील मोशी येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील 4 विद्यार्थीनींनी पिझ्झा खाल्ला म्हणून त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असून, वसतिगृहाच्या गृहप्रमुखान मार्फत प्रशासकीय बाब म्हणून संबंधित विद्यार्थीनींना फक्त समज देण्यात आली होती. प्रत्यक्षात कोणत्याही विद्यार्थीनींना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेले नाही,ही वस्तू स्थिती आहे. वसतिगृहातून विद्यार्थिनींना काढून टाकल्याचे वृत्त चुकीचे आहे.असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्याकडून जयंत पाटील यांचे कौतुक
सांगलीत पश्चिम महाराष्ट्र उद्योग-व्यापार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही सर्व नेतेमंडळी एका व्यासपीठावर एकत्र आली होती. यावेळी उदय सामंत  मी देखील आधी  जयंत पाटील यांच्याच तालमीतच तयार झालोय, पण आता तुमच्या तालीमत तयार होतोय असे  चंद्रकांत पाटील यांना उद्देशुन म्हंटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या भाषणात  आतापर्यंत सगळ्याच  खात्याचे मंत्री म्हणून काम केलेले आणि राज्यातील जेष्ठ नेते असे म्हणत जयंत पाटील यांची स्तुती केली आणि आपण जयंत पाटील यांच्या केलेल्या स्तुतीची बातमी होईल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
आज पासून उच्च माध्यमिक परीक्षा

आजपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची बारावी ची परीक्षा सुरू होत असून बुलढाणा जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रावर ३४६३५ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. यासाठी शिक्षण विभागाने चोख अशी व्यवस्था केली असून कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षण , महसूल व पोलिस विभागाची भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी लागू करण्यात येणार असून परिसरातील झेरॉक्स केंद्र परीक्षा कालावधीत सक्तीने बंद ठेवण्यात येणार आहेत.

भाजीबाजारात भाज्यांचे दर कोसळले

भाजीबाजारात भाज्यांचे दर कोसळले


बाजारात पत्ता गोबी 5 रुपये किलो, फुल गोबी 5 रुपये किलो, टमाटर 5 रुपये किलो, सांभार 10 रुपये किलो, पालक 4 रुपये किलो इतरही भाज्या मातीमोल भावात ठोक मध्ये विजल्या जात आहे


शेतकऱ्यांना बाजारात भाजी आणणं देखील पडतेय महागात..


अनेक शेतकरी शेतातच फेकून देताय भाजीपाला...


भाज्यांच्या दराला योग्य भाव मिळावा अशी मागणी शेतकरी करताय..


संपूर्ण अमरावती जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर कोसळलेले...

विदर्भात प्रसिध्द असलेली चिमुरची घोडा यात्रा संपन्न, जग्गन्नाथ पुरी प्रमाणे हाताने लाकडी रथ ओढण्याची 300 वर्षांची प्रथा

संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेली चिमुरची घोडा यात्रा काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडली. चिमुरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री बारा नंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जग्गन्नाथ पुरी प्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं व त्यानंतर तिची पहाटे पर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली होती. जवळ-जवळ तीनशे वर्षांपासून सुरु असलेल्या या घोडायात्रेला पेशव्यांच्या काळापासून सुरुवात झाली. पेशवाईतल्या साडे तीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसलेंच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हा पासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली. या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो लोकं चिमूर मध्ये दाखल होतात. तिरुपतीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे सुध्दा या काळात चिमूर मध्ये लोकांची मोठी गर्दी होते. १९४२ ला इंग्रजांविरुध्द झालेल्या चिमूर क्रांती मध्ये सुध्दा या बालाजी मंदिराची भूमिका महत्वाची होती आणि त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतर सुध्दा लोकांमधलं आपलं स्थान अजूनही कायम ठेवून आहे.

कुत्र्यांने सहा जणांना घेतला चावा; परिसरात भीतीचे वातावरण 
उल्हासनगर कॅम्प नं-१, तानाजीनगर परिसरात पिसाळलेल्या  कुत्र्यांने सहा जणांना घेतला चावा  परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या  पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे .

कुत्र्याने महिलांना  एखाद्या धारदार हत्याराने वार करावेत असे पायाचे लचके तोडले आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात कोकिळा जोगदंड यांच्या रंजना सोनवणे या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू या पिसाळलेल्या कुत्र्याने एका आठवड्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांसह 22 जणांना लक्ष केलेले आहे. या गंभीर घटनेनंतर महानगरपालिका मोकाट कुत्र्यांवर कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आजपासून बारावीची परिक्षा, संवेदनशील परिक्षा केंद्रांवर असणार सीसीटीव्हीचा वॅाच

- आजपासून बारावीची परिक्षा, संवेदनशील परिक्षा केंद्रांवर असणार सीसीटीव्हीचा वॅाच


- नागपूर विभागात बारावीचे १ लाख ५८ हजार विद्यार्थी देणार परिक्षा 


- प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही होणार


- परिक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास ते केंद्र कायमस्वरूपी बंद होणार

निधी नसल्याने महाज्योतीचे ९०० संशोधक शिष्यवृत्तीपासून अद्यापही वंचित 

- निधी नसल्याने महाज्योतीचे ९०० संशोधक शिष्यवृत्तीपासून अद्यापही वंचित 


- ‘महाज्योती’च्या वतीने पीएच.डी करणाऱ्या संशोधकांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी, असा शासन निर्णय राज्य सरकारने काढला होता


- त्यानुसार बार्टी आणि सारथीने अधिछात्रवृत्ती दिली. परंतु, महाज्योतीचे ९०० संशोधक या शिष्यवृत्तीपासून अद्यापही वंचित आहेत


- सरकारने २५ जुलै २०२४ ला सर्व संशोधक पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला


- बार्टी आणि सारर्थीच्या संशोधकांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात आली


- पण महाज्योतीचे संशोधक अद्यापही अधिछात्रवृत्तीपासून वंचित आहेत. त्यामुळे महाज्योतीच्या ९०० विद्यार्थ्यांवर शासनाने अन्याय केला अशी भावना आहे

प्रिकराच्या मदतीने पत्नीने काढल पतीचा काटा, मालाडच्या मालवणीतील धक्कादायक घटना

प्रिकराच्या मदतीने पत्नीने काढल पतीचा काटा, मालाडच्या मालवणीतील धक्कादायक घटना


मालवणी येथील गावदेवी मंदिर परिसरातील सोहम कंपाऊंड येथे रविवारी मृतदेह सापडला होता. 


स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून माहिती दिली होती.


पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वापर करण्यात आल्याचे दिसून आले.


मालवणी पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटिव्ही पाहण्यास सुरूवात केली


त्यावेळी पहाटे दुचाकीवर बसवून मृतदेहाला तेथे आणण्यात आल्याचे दिसून आले. दुचाकीवर महिला व एक पुरूष बसला होता.

अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक

अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक


पीडित मुली सहा व आठ वर्षांच्या आहेत. 


आरोपी तरूणाने पीडित मुलींना खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी नेऊन त्यांना अश्लील चित्रफीत दाखवून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.


बुधवारपासून रविवारपर्यंत आरोपी अधूनमधून पीडित मुलींना खेळण्यासाठी घेऊन जात होता


पीडित मुलींच्या आईने मुलीकडे केलेल्या चौकशी दरम्यान  हा प्रकार उघड झाला.


रविवारी आरोपीविरोधात ओशिवरा पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.


या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: दोन महिनेआधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी, पळून गेलेल्या आरोपींचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 9 डिसेंबर रोजी सरपंचांची हत्या झाल्यानंतर, संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेसह सहाजण धाराशिवच्या वाशी परिसरातील पारा चौकात पोहोचले आणि या परिसरात गाडी सोडून सहा आरोपी पळून गेले. यासह आजपासून बारावीच्या बोर्डाची परिक्षा सुरु होणार आहे. तसेच दिल्लीत कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत चर्चा रंगली आहे. तर आज महाराष्ट्राची कॅबिनेट बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.