
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे उद्धव ठाकरे यांचे आपल्याला दोन फोन आले होते असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला. या प्रकरणात आपण सहकार्य करावं अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. या प्रकरणी आपण आदित्यचं नाव घेतलं नाही, पण तो संध्याकाळी कुठे जातो, ते पाहून जरा काळजी घेण्याची सूचना उद्धव ठाकरेंना आपण केल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला.
दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांनी पुन्हा एकदा नव्याने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव असून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना दोन कॉल केल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. त्यावर नारायण राणे यांनी त्या दोन कॉलमध्ये नेमकं काय संभाषण झालं याची माहिती दिली.
Narayan Rane Uddhav Thackeray Call : पहिल्या कॉलमध्ये काय बोलले?
नारायण राणे म्हणाले की, "ही जी घटना घडली होती त्यावेळी एक फोन आला. मिलिंद नार्वेकरांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांना बोलायचं आहे. सध्या आदित्यचं नाव घेता त्याचा उल्लेख करू नये अशी विनंती करतो असं ते म्हणाले. एका निरपराध मुलीची हत्या केली गेली त्यामध्ये आरोपींना शिक्षा मिळावी असं मी त्यांना म्हणालो. संध्याकाळी तुमची मुलं कुठे जातात त्याची काळजी घ्या. त्यावर ते म्हणाले की तशी काळजी घेतो पण तुम्ही सहकार्य करा."