गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
जयदीप मेढे
Updated at:
22 Mar 2025 03:47 PM (IST)

1
राज्यात सध्या वाळलेल्या लाल मिरच्यांची मोठी आवक होत आहे. नागपूर, मुंबईच्या मार्केटमध्ये गावरान, स्थानिक मिरच्यांचा एकच ठसका उठलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
सध्या लाल मिरच्यांची आवक कमी असली तरी शुक्रवारी मिरचीची रेकॉर्डब्रेक आवक नोंदवण्यात आली आहे.

3
चरकी, हायब्रीड मिरच्याही बाजारात मोठ्या प्रमाणात येतायत. नागपूरच्या बाजारात शुक्रवारी 2757 क्विंटल मिरच्यांची आवक होत असून साधारण 12250 रुपयांचा भाव मिळाला.
4
मुंबईच्या बाजारसमितीत लोकल लाल मिरच्यांना 21 हजार रुपयांचा भाव मिळाला.
5
शुक्रवारी बाजारपेठेत 4789 क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे.
6
तिखट लालचुटुक मिरच्यांची आवक वाढल्या खऱ्या पण काही बाजारसमित्यांमध्येच भाव मिळत आहे. अकोला, मुंबई, नागपूर, नांदेड अशा सर्व बाजारसमित्यांमध्ये मिरच्यांची आवक होतेय.