एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News Live Updates: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीत जाणार

Maharashtra Breaking News 11 December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News Live Updates 11 December 2024 wensday pune mumbai weather updates kurla best bus accident all update maharashtra politics devendra fadnavis eknath shinde ajit pawar bjp shivsena congress ncp Maharashtra Breaking News Live Updates: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीत जाणार
Maharashtra Updates
Source : Maharashtra Updates

Background

मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईतील कुर्ला या भागात भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडलं आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या घटनेनंतर वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पातळीवरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आजही या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात थंडी वाढली आहे. पारा घसरल्यामुळे जागोजागी शेकोटी पेटताना दिसतेय. राज्याच्या राजकारणातही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही रंगल्या आहे. या सर्व घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

14:44 PM (IST)  •  11 Dec 2024

जाळपोळ, दगडफेकीनंतर परभणीत थेट जिल्हाधिकारी कार्यालय फोडले

परभणीत रस्त्यांवर जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर आता थेट जिल्हाधिकारी कार्यालय फोडले 

काही आंदोलन महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या आणि या महिलांनी  काचा दरवाजे टेबल खुर्च्यांची तोडफोड केली आहे

अर्ध्या तासापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि इतर आंदोलकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं केलं होतं आवाहन

14:43 PM (IST)  •  11 Dec 2024

मध्यप्रदेश राज्यातून गोंदियात सागवन लाकडाच्या तस्करीचा पुष्पा पॅटर्न!

वनविभागाने 4 लक्ष रुपयाचा सागवान केला जप्त.... 

सध्या सगळीकडे एका चित्रपटाची चर्चा जोरात होत आहे... त्या चित्रपटाचं नाव आहे पुष्पा-2 ... या चित्रपटांमध्ये चंदनाची तस्करी करत असल्याचे दाखविले आहे. अगदी तशाच पद्धतीने मध्य प्रदेश राज्यातून उच्च प्रतीच्या सागवनाची तस्करी करुन सागवान साठवून  ठेवणाऱ्यावर गोंदिया वनविभागाने कारवाई केलेली आहे.. गोंदिया वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी यांना मध्यप्रदेशातील जंगलातून सागवान तोडून त्याचा अवैध साठा गोंदियातील मुंडीपार येथे असलेल्या रांदल गोदामात असल्याची माहिती मिळाली. वनविभागाच्या पथकाने छापा टाकून चार घनमीटर (140 घनफूट) लाकूड जप्त केले. त्याची अंदाजे किंमत 4 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.  याप्रकरणी गोदाम चालक चिराग पटेल याला वनविभागाकडे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे... पुढील तपास गोंदिया वनविभाग कडून सुरू आहे...

14:16 PM (IST)  •  11 Dec 2024

परभणीत जमावबंदी! 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

जिल्हाधियाक्र्यानी काढले जमाबंदीचे आदेश 

५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई 

आज दुपारी १ वाजेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार 

इंटरनेट, ध्वनी क्षेपक, टेलिफोन, एसटीडी, झेरॉक्स केंद्र, फैक्स केंद्रही बंद ठेवण्याचे आदेश

14:13 PM (IST)  •  11 Dec 2024

संविधानाची विटंबना करणाऱ्यांना तत्काळ अटक करा: अन्यथा.. प्रकाश आंबेडकर

परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून  एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन  ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे.

14:11 PM (IST)  •  11 Dec 2024

मस्साजोग खून प्रकरणात आणखी एक आरोपी ताब्यात

मस्साजोग चे  सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात आणखी एक आरोपीला केली अटक

गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

प्रतीक घुले याला रांजणगाव मधून केले अटक..

एकूण आठ आरोपी पैकी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

उर्वरित फरार आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget