एक्स्प्लोर
बारावीचा निकाल जाहीर, 86.60 टक्के उत्तीर्ण
पुणे : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा 86.60 टक्के लागला आहे.
यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 93.29 टक्के निकाल इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचे 83.99 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालातही मुलींच उत्तीर्ण होण्याचं जास्त आहे. राज्यात 90.50 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 83.46 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत येत्या 3 जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल.कुठे पाहाल निकाल?
बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल दुपारी एक वाजता पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहा. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचे नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.बारावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 9 जुलै 2016
एकूण निकाल 86.60 टक्के
मुलांची टक्केवारी- 83.46 टक्के
मुलींची टक्केवारी - 90.50 टक्के
कला - 78.11 टक्के
विज्ञान- 93.16 टक्के
वाणिज्य- 79.10 टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम- 81.68 टक्के
विभागवार -
कोकण- 93.29 टक्के
कोल्हापूर- 88.10 टक्के
औरंगाबाद- 87.80 टक्के
पुणे- 87.26 टक्के
नागपूर- 86.35 टक्के
लातूर- 86.28 टक्के
मुंबई- 86.08 टक्के
अमरावती- 85.81 टक्के
नाशिक- 83.99 टक्के
457 शाळांचा निकाल 100 %
36 शाळांचा निकाल शून्य %
अपंगांचा निकाल 89.61 %
-------------
मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज्यातील बारावी म्हणजेच एचएससी परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. फेब्रुवारी/ मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत येत्या 3 जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल. राज्यातील सुमारे 13 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. जुलै महिन्यात बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर निकाल जाहीर केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार हा निकाल जाहीर करण्यात येईल.कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहा. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचे नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.बारावीचा आज निकाल, कुठे आणि कसा पाहाल निकाल?
एबीपी माझा वेब टीम, मुंबईअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement