Winter Session 2023 : विधानसभेत आज बीडमधील जाळपोळ प्रकरणावर चर्चा होणार, आमदार संदीप क्षीरसागर जाळपोळ प्रकरणी भुमिका मांडणार

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates: विधानपरिषदेत अवकाळी पावसाने झालेलं नुकसान, तृतीयपंथी समाजाचं आरक्षण, यावर चर्चा केली जाणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Dec 2023 09:48 AM
Nagpur Congress Meeting: राज्यातील काँग्रेस नेत्यांची नागपूरमध्ये महत्वाची बैठक

Nagpur Congress Meeting: राज्यातील काँग्रेस नेत्यांची नागपूरमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. नागपूरमध्ये होणा-या सभेच्य तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. 

BJP:  आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या मॅरेथॉन बैठका

BJP:  आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या मॅरेथॉन बैठका घेण्यात येत आहे. नागपुरात फडणवीस यांच्या घरी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरणार आहे. 

Ajit Pawar: महिलांसाठी निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

Ajit Pawar: महिलांना सायबर जागरूक करणाऱ्या महिला आयोगाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक केले आहे.  तर महिलांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अजित पवारांची ग्वाही दिली आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2023:  विधानसभेत बीड जाळपोळ प्रकरणावर चर्चा होणार

Maharashtra Assembly Winter Session 2023:   विधानसभेत आज बीडमधील जाळपोळ प्रकरणावर चर्चा होणार आहे. आमदार संदीप क्षीरसागर जाळपोळ प्रकरणी भुमिका मांडणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates: हिवाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. आज अनेक मुद्द्यांवरून विधानसभा तापण्याची शक्यता आहे... त्यात बीडमधील जाळपोळीचं प्रकरण, मुंबईतील आरे कॉलनीतील राम मंदिर सांस्कृतिक केंद्रच्या जागी कब्रस्थान बनवण्याचा प्रयत्न, यासारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. तर विधानपरिषदेत  अवकाळी पावसाने झालेलं नुकसान, तृतीयपंथी समाजाचं आरक्षण, यावर चर्चा केली जाणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.