एक्स्प्लोर

Maharashtra Winter Session Live Updates: हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईला होणार

Maharashtra Winter Session Live Updates: महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. जाणून घ्या विधीमंडळ अधिवेशनाचे लाइव्ह अपडेट्स...

Key Events
maharashtra assembly winter session 2022 live updates maharashtra karnataka border row maharashtra winter session day last day live updates Maharashtra Winter Session Live Updates: हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईला होणार
Maharashtra Winter Session Live Updates

Background

Maharashtra Winter Session Live Updates: अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session) आज अखेरचा दिवस आहे. आजवरच्या परंपरेप्रमाणे शिंदे फडणवीस सरकार विदर्भातून जाता जाता काही पॅकेज जाहीर करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा आराखडा सांगताना अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. विधान परिषदेत सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सत्ता पक्षाची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होईल.  

 विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आक्रमक पावित्र्यात असलेल्या विरोधकांकडून आजही आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तर, विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. 

काल विधानसभा आणि विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात आला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना आणि प्रकल्पांसाठी निधी जाहीर केला..  कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्रात आता 'स्वाधार' सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही मोठी घोषणा केली...  ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृह सुरू व्हावे... यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी विधानसभेत सांगितलं

विधानसभेत सरकारच्या घोषणा

  • राज्यात आता 'स्मार्ट अंगणवाडी' होणार 9 हजार कंपन्या व संस्थांना पत्र,800 हून अधिक संस्थांचा अंगणवाडी दत्तक घेण्यास पुढाकार
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजारांचा  बोनस जाहीर
  • नागपूर मेट्रो रेल प्रकल्पटप्पा-1 ला 9 हजार 279 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता 
  • वडसा देसाईगंज-गडचिरोलीनवीन रेल्वे मार्गासाठी 1 हजार 96  कोटी सुधारित खर्चास मान्यता
  • विदर्भ, मराठवाड्यातील 70 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता
  • विदर्भामध्ये एकूण 44 हजार 123 कोटी रुपयांची गुंतवणूक 45 हजार रोजगार निर्मिती होणार
  • गडचिरोलीत 20 हजार कोटी गुंतवणुकीचा खनिजउत्खनन प्रकल्पास मान्यता
  • गोसीखुर्द येथे 100 एकरजागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार
  • बुलडाण्यातील अरकचेरीआणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता
  • सुमारे 1 हजार 918 हेक्टरजमिनीला सिंचनाचा फायदा होणार
  • लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी

19:45 PM (IST)  •  30 Dec 2022

CM Eknath Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले... 

CM Eknath Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले... 

नागपूर मधलं हे पहिलं अधिवेशन, दोन वर्ष झाली नाहीत. पण सरकार बदललं नसतं तर तेही कोविडच्या नावाखाली झालं नसतं. नागपूर अधिवेशन विदर्भासाठी महत्वाचं असतं, सभागृह सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत चालत होते.  

अनेक प्रलंबित प्रश्न या अधिवेशनात मार्गी लागले

धानाचा महत्वाचा निर्णयामुळे त्यातील दलालीला चाप बसेल

विरोधकांनी हा विषय लावून नाही घरला. मात्र शेतकऱ्याला जे हवंय ते आम्ही दिलं

समतोल प्रादेशिक विकासााठीही प्रयत्न करू

नागपूर ते गोवा नवा महामार्ग होईल

पर्यटनालाही चालना देतोय

गोसेखुर्द प्रकल्पाचं काम सुरू आहे

पूर्वीचं आम्ही सांगत नाही खर्च झाला पण जमीन पाण्याखाली आली नाही

आम्ही १८ प्रकल्प आणले त्यामुळे ४५ हजार रोजगार मिळेल

राज्यात ७० हजाराची गुंतवणूक येत आहे

खनिज उद्योगालाही चालना दिली 

गोसेखुर्दचा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल

असे अनेक प्रकल्पांना चालना देण्यासाठीच महत्वाचे निर्णय घेतले

यामुळे विदर्भातील आत्महत्या कमी होतील ही अपेक्षा आहे.

यामध्ये निधीही कुठे कमी पडणार नाही याचीही तजवीज सरकार करते आहे

विरोधीपक्षाने सुरवातीला तीन चार दिवस आंदोलन सुरू होतं

आंदोलनाचे विषयचं नव्हते ण आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला

मात्र सभागृहापेक्षा ते बाहेर केला. त्यांच्याही प्रश्नांना उत्तर दिली

विरोधी पक्षाच्याही सूचना आम्ही घेतल्या. त्यानीही कामकाजाच सहकार्य केल्याने त्यांचे ही धन्यवाद मानतो

सरकारकडून त्रुटी रहात असतील तर विरोधी पक्षला तो सुचवायचा अधिकार आहे

अधिवेशन चांगलं झालं विदर्भ वासियांसाठी हे अधिवेशन महत्वाचं झालं

विरोधकांनी आरोप केले पण  NIT चं प्रकरण न्यायालयानं मिटवलं

19:31 PM (IST)  •  30 Dec 2022

लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करत होते, ते सभागृहात फक्त 46 मिनिटे होते, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

रोज जे लोकं लोकशाहीची दुहाई देत लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करत होते. ते सभागृहात फक्त 46 मिनिटे होते. एका बाजूला तुम्ही लोकशाहीची गोष्ट करता आणि लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात फक्त 46 मिनिटे राहता- देवेंद्र फडणवीस

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget