एक्स्प्लोर

विधानसभा अध्यक्षांची निवड पुन्हा लांबणीवर? या अधिवेशनात निवडणूक अधांतरी

Maharashtra Assembly Speaker Election : यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याचे वृत्त आहे. राज्यपालांच्या पत्रामुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचे म्हटले जात आहे.

Maharashtra Assembly Speaker Election : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीबाबत राज्यपालांना चार पत्र लिहिले होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव ही निवडणूक शक्य नसल्याचे राज्यपालांनी म्हटले होते. त्यानंतरही महाविकास आघाडी सरकारकडून या निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू होते. आता मात्र, ही निवडणूक लांबणीवर गेली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवडणूक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेत अध्यक्ष निवडीबाबत कोणताच उल्लेख नाही. त्यामुळे आघाडी सरकारनं अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला की काय अशी चर्चा सुरु झाली होती.  सत्ताधारी तीनही पक्षांनी त्यांच्या आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेरच्या दिवशी नाट्यमय राजकीय घडामोडी घडतात का याकडे लक्ष लागले होते. 

या कारणांमुळे निवडणूक नाही?

ज्य सरकारच्या पत्राला राज्यपालांनी उत्तर धाडलं असलं तरी त्यात काय संदेश दिलाय हे अद्याप समोर आलेलं नाही. एकीकडे काँग्रेस निवडणुकीसाठी आग्रही असताना सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांनी मात्र राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेऊ नये अशी भूमिका घेतल्याचं कळतं. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक घेण्यास विरोध दर्शवलाय. त्यामुळे अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाच्या निवडणूक बारगळणार असल्याचे वृत्त आहे. तर, दुसरीकडे आघाडीच्या नेत्यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू केली आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांची राज्यपालांवर टीका 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजभवनात अभ्यास आणि विद्ववतेचं अजीर्ण झालं असल्याचे त्यांनी म्हटले. विधीमंडळाचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती झाली नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget