एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीस यांचे उत्पन्न पाच वर्षात 20 पटीने वाढले
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014-15 साली आयकर विवरणपत्रात 1 लाख 24 हजार 647 रुपये उत्पन्न दाखवलं होतं. त्यांचं उत्पन्न आता तब्बल 20 पटीने वाढलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014-15 साली आयकर विवरणपत्रात 1 लाख 24 हजार 647 रुपये उत्पन्न दाखवलं होतं. त्यांचं उत्पन्न आता तब्बल 20 पटीने वाढलं आहे. 2018-19 साली फडणवीस यांचं उत्पन्न 25 लाख 46 हजार 047 रुपये इतकं झालं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीविषयीची माहिती जाहीर केली आहे.
मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं उत्पन्नदेखील तिपटीने वाढलं आहे. अमृता यांचं उत्पन्न 18 लाखांवरुन 50 लाखांवर पोहोचलं आहे.
फडणवीस यांच्या 8 लाख 29 हजार रुपयांच्या एफडी आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 3 लाख 37 हजार रुपयांच्या एफडी आहेत. शेअर्स म्यूच्युअल फंडात देवेंद्र फडणवीसांची कसलीही गुंतवणूक नाही. परंतु त्यांच्या पत्नीकडे 2 कोटी 33 लाख रुपयांचे शेअर्स, म्यूचअल फंड आहेत.
फडणवीस यांच्याकडे 14 लाखांच्या पॉलिसी आहेत, तर अमृता यांच्याकडे 6 लाखांच्या पॉलिसी आहेत. मुख्यमंत्र्यांकडे 6 लाखांची एक महिन्द्रा एक्सयूव्ही आहे तर 7 हजाराची मोटरसायकल आहे. तसेच 17 लाख 40 हजार रुपयांचे दागिने आहेत. मुख्यमंत्र्यांकडे 45 लाखांची चल संपत्ती आहे, तर मिसेस मुख्यमंत्र्यांकडे 3 कोटी 39 लाख 58 हजार रुपयांची चल संपत्ती आहे.
मुख्यमंत्र्यांकडे वडिलोपार्जित आणि स्वकमाईच्या जमीन, शेती, फ्लॅट व्यावसायिक गाळ्यांची किंमत 3 कोटी 78 लाख रुपये आहे तर अमृता यांनी जवळजवळ एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 62 लाखांचं कर्जही दाखवलं आहे.
व्हिडीओ पाहा
जमिनींच्या बाजारमूल्यात गेल्या पाच वर्षांत झालेल्या वाढीमुळे आणि गेल्या पाच वर्षांत आमदारांचे वेतन दोन वेळा वाढवण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
आदित्य ठाकरे कोट्यधीश, किती संपत्ती आहे आदित्य ठाकरेंच्या नावे? | Mumbai | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement