एक्स्प्लोर
Yavatmal: एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाचा धुमाकूळ, राजुरा ते अमरावती प्रवासासाठी फाडलं 800 रुपयांचं तिकीट
Yavatmal: मद्यधुंद एसटी बस वाहकामुळं प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
Yavatmal: यवतमाळ बसस्थानकावर राजुरा अमरावती एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाने चांगलाच धुमाकूळ घातला. राजुरा येथून या बसमध्ये बसलेले प्रवासी देखील या दारूच्या नशेत टूल्ल वाहकामुळे चांगलेच वैतागले. अक्षय बट्टे असे या वाहकाचे नाव असून तो एवढा दारू प्यायला होता की प्रवाशांना अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट त्याने फाडून दिले. त्यानं राजुरा ते अमरावती या प्रवासासाठी चक्क 800 रुपयांचे तिकीट फाडले. त्यानंतर कशाचेही भान नसलेला हा मद्यपी वाहक बसमध्ये खाली लोळला. अखेरीस यवतमाळ मध्ये ही बस थेट अवधुतवाडी पोलीस ठाण्यात आणून वाहतूक नियंत्रकाने तक्रार दाखल केली. त्यानुसारा त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याचा प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement