राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


लाखो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, शिंदे फडणवीस सरकारची अनोखी भेट


यंदा आषाढी यात्रेमध्ये लाखो विठ्ठल भक्तांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प शिंदे फडणवीस सरकारने केला आहे. जवळपास 15 लाख भाविकांची आरोग्य तपासणी या यात्रेत होणार असल्याने ही वारी आरोग्य वारी ठरणार आहे. एका बाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला भुलवण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूर वारी करत असताना, राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी यंदाची वारी आरोग्य वारी करण्याचा चंग बांधला आहे. याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यावर सोपवली असून जवळपास 10 हजार तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफ लाखो वारकऱ्यांच्या सेवेत असतील. वाचा सविस्तर


सर्पदंशाने महिलेचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांच्या दिंडोरीतच आरोग्य सुविधांचा अभाव 


केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या दिंडोरी मतदारसंघातच आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील वनारवाडी येथील एका 65 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने या महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. वाचा सविस्तर


त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत होते.... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शरद पवारांचं खोचक उत्तर


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 1977 मधील घडामोडींचा संदर्भ देताना पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं वक्तव्य केलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. "1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात," असं शरद पवार म्हणाले. बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सोबतच राष्ट्रवादीमधील बदलांबाबतही भाष्य केलं. वाचा सविस्तर


दापोलीत भीषण अपघात, वडाप गाडी-ट्रेलरची जोरदार धडक, आठ जणांचा मृत्यू, सात जखमी


रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर रविवारी (25 जून) संध्याकाळी मॅक्झिमो (वडाप गाडी) आणि ट्रेलर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बाप-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत.या अपघातामध्ये मॅक्झिमोचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे दापोली आणि हर्णे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने जंगलामध्ये पळ काढला. वाचा सविस्तर


नगरपालिकेच्या शाळेतही मिळणार डिजिटल शिक्षण, नंदुरबारमधील नगरपालिकेच्या पाच शाळा डिजिटल


राज्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडत आहेत. मात्र नंदुरबार नगरपालिकेने शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यामुळे इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण  मिळावे, या शैक्षणिक वर्षात नगर पालिकेतील 12 शाळामधील पाच शाळांचे वर्ग खोल्या डिजिटल करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे. वाचा सविस्तर