राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट, तर उद्या अंधेरी, कुर्ल्यात स्फोट घडवण्याची धमकी


मुंबई पोलिसांना येणाऱ्या धमक्यांचे फोन काही थांबण्याचं काही नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमचा फोन खणाणला आणि पुन्हा एक धमकीचा मेसेज  मिळाला. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे बॉम्बनं उडवण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली. तसेच, अंधेरी, कुर्ला भागात उद्या  संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली आहे. वाचा सविस्तर


सात वर्षांच्या मुलाच्या आधार कार्डवर फोटो चक्क देवेंद्र फडणवीसांचा


देशात सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची गरज लागते. मात्र, याच आधार कार्डवर  फोटो दुसऱ्या कोणाचा नाव तिसऱ्या कोणाचे असे अनेक प्रकार घडले आहे. मात्र आता चंद्रपूर जिल्ह्यातील एका सात मुलांच्या आधारकार्डवर चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता हे आधार कार्ड चांगलंच चर्चेत आलं आहे. वाचा सविस्तर


नेते मंडळी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र, विरोधकांच्या बैठकीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका


भाजप आणि मोदी यांच्याविरोधात आज देशातील विरोधी पक्ष पाटण्यात एकत्र आले आहेत. विरोधकांच्या या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत घराणेशाहीवरही भाष्य केलं आहे. नेते मंडळी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आल्याचा प्रहार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. "सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे, तर उद्धव ठाकरे यांना आदित्यची चिंता आहे म्हणून ते एकत्र आले आहेत," असाही टोला त्यांनी लगावला आहे. वाचा सविस्तर


'म्हाडा' मुंबई मंडळ सोडत 2023 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; थेट 10 जुलैपर्यंत मुदतवाढ


म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी उशीर झालाय? कागदपत्रांची जुळवाजुळव अजून पूर्ण झालेली नाही? अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली म्हणून गोंधळून जाऊ नका. कारण म्हाडाकडून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4 हजार 82 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे 18 जुलैला होणारी सोडत आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर


महिलांना छेडणाऱ्यांची आता खैर नाही; महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली, काय आहे पोलिसांचा प्लॅन?


पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आता पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या नोकरदार महिलांची, विशेषतः आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने विशेष सुरक्षा मोहीम सुरु केली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांचा सहभाग असेल. वाचा सविस्तर