चंद्रपूर : देशात सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची (Aadhaar Card) गरज लागते. मात्र, याच आधार कार्डवर फोटो दुसऱ्या कोणाचा नाव तिसऱ्या कोणाचे असे अनेक प्रकार घडले आहे. मात्र आता चंद्रपूर जिल्ह्यातील एका सात मुलांच्या आधारकार्डवर चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांचा फोटो असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता हे आधार कार्ड चांगलंच चर्चेत आलं आहे.
आधार कार्ड चर्चेत
चंद्रपुरातील जिगल सावसाकडे हा सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा या गावातील रहिवासी आहे. त्याचा जन्म त्याच्या आजोळी म्हणजे चिमूर तालुक्यातील शिवरा या गावात झाला. त्याच्या आईने गावाजवळ असलेल्या शंकरपूर येथे त्याचे आधार कार्ड काढले. मात्र हे आधार कार्ड जेव्हा घरी आले तेव्हा त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता.
प्रशासनाने आपली चूक दुरुस्त केली
सिंदेवाही तालुक्यात राहणाऱ्या जिगल जीवन सावसाकडे या मुलासोबत हा प्रकार घडला आहे. जिगलचा जन्म होऊन एका वर्षानंतर आधार कार्ड काढण्याच्या शिबिरात हे आधार कार्ड काढून घेतले होते. हे कार्ड आल्यानंतर त्यामध्ये जिगलच्या ऐवजी चक्क राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापून आला होता. यानंतर जिगलच्या कुटुंबियांनी हा फोटो बदलून घेण्यासाठी आधार केंद्र गाठले. मात्र हे उघडकीस येताच प्रशासनाने आपली चूक दुरुस्त केली. सोबतच ही गंभीर चूक करणाऱ्या एजन्सी बाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलं आहे.
चुकून फडणवीस यांचा फोटो आधार कार्डवर आला
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने याबाबत हास्यास्पद कारण दिले आहे. चिमूरच्या तहसीलदार यांनी सांगितल्या प्रमाणे जिगल सावसाकडे या मुलाचा फोटो काढताना त्याच्या मागे फडणवीस यांचे पोस्टर होते आणि फोटो काढतांना मुलगा हलल्याने चुकून फडणवीस यांचा फोटो आधार कार्डवर आला. मात्र यावर प्रशासनाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. तर दुसरीकडे हे प्रकरण उघडकीस येताच प्रशासनाने तातडीने जिगल सावसाकडे असलेल्या आधार कार्डमध्ये बदल करून त्याचा फोटो लावला आहे.
हे ही वाचा :