एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2021 | बुधवार | एबीपी माझा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

स्मार्ट बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2021 | बुधवार | एबीपी माझा

1.मुंबई पोलिसांकडून पहाटे तीनपर्यंत सुरु होती पंच प्रभाकर साईल यांचं जबाब नोंदवण्याची प्रक्रिया, एनसीबीकडून आज वानखेडे आणि प्रभाकर यांच्या चौकशीची शक्यता
Mumbai Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलनं रात्री मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. मुंबई पोलिसांचे झोन वनच्या डिसीपींच्या ऑफिसमध्ये प्रभाकर साईल मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 8 तासांपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. प्रभाकर सईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहे. तर दुसरा साक्षीदार असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. 

2. नवाब मलिकांचा नवा दावा, समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची वेळ, मेहेरच्या रकमेची माहिती दिली

Nawab Malik VS Sameer Wankhede: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांचा 'सिलसिला' सुरुच आहे. आज सकाळी सकाळी नवाब मलिकांनी पुन्हा ट्वीट करत वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत काही दावे केले आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, गुरुवार 7 डिसेंबर 2006 रोजी रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि सबाना कुरेशी यांच्यात लोखंड वाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) मुंबई येथे निकाह पार पडला. मेहेरची रक्कम रु.33000 होती. साक्षीदार क्रमांक 2 हा समीर दाऊद वानखेडेची मोठी बहीण यास्मिन दाऊद वानखेडेचा अजिज खान पती होता, असा दावा मलिकांनी केला आहे. सोबतच दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेंचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नाही.  ज्या फसव्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे आहे, असं मलिकांनी म्हटलंय.


3.आर्यन खानच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी, आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचा वकील रोहतगींचा युक्तिवाद

4. किरण गोसावी यांचा पुणे पोलिसांना पुन्हा एकदा गुंगारा, उत्तर प्रदेशातूनही फरार झाल्याची माहिती

5. तामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यात फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 5 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जणांची प्रकृती गंभीर

6. चिमुकल्यांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण दृष्टीक्षेपात, मुंबईत सात वर्षांखालील मुलांवर लशीची यशस्वी चाचणी, लस देण्यात आलेली मुलं ठणठणीत
 
7. काल दिवसभराच्या लपंडावानंतर पुण्याच्या हडपसरमधील बिबट्या रात्री जेरबंद, सीरम इन्स्टिट्यूटजवळ बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी
 
8. किलो क्लास पाणबुडी संदर्भातील गोपनीय माहिती गहाळ, मुंबई वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये कार्यरत कमांडरसह दोघांना अटक, सीबीआयच्या नोएडा, दिल्ली, हैदराबादमध्येही धाडी

9. वर्णद्वेषीविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यास दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉकचा नकार, विंडीज विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या क्षणी माघार

10. पाकिस्तानचा सलग दुसरा विजय, न्यूझीलंडचा केला पराभव, तर दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर विजय
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवालYuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Embed widget