मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी पाच हजारांच्या पार गेली आहे आहे. लॉकडाऊनदरम्यान पोलिसांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. मात्र राज्यात जवळपास 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानं चिंता वाढवली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 12 अधिकारी आणि 52 कॉन्टेबल यांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या 64 पोलिसांमध्ये 34 पोलीस मुंबईतील आहेत.
हिंगोलीमध्ये सीआरपीएफच्या सहा जवानांना कोरोनाची बाधा
हिंगोलीतील सीआरपीएफच्या सहा जवानांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जवान मुंबईत कार्यरत होते. मुंबईतून परतल्यानंतर त्यांची कोरोना व्हायरसची टेस्ट केली त्यावेळी ती पॉझिटिव्ह आढळले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरपीएफच्या दोन तुकड्या मुंबईहून परत आल्या होत्या. हे सर्व मुंबईत 45 दिवस तैनात होते. त्यामुळे त्यांना खबरदारी म्हणून क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
'वर्षा'वर तैनात असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
- कोरोना 'मातोश्री'च्या उंबरठ्यावर, मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण
- वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांची शिक्षा; केंद्र सरकारचा अध्यादेश
- Attack on Doctors | अमित शाहांच्या आश्वासनानंतर आयएमएच्या डॉक्टरांचं आंदोलन मागे
Corona Ground Report | कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट! काय म्हणतोय गावाकडचा कोरोना?