नागपूर : शासनाकडून आलेल्या स्वस्त धान्याचा काळाबाजार केला जात आहे. गरिबांना धान्य न देताच ते काळाबाजारीसाठी पाठवून शासनाची कशी दिशाभूल करणे सुरु आहे. असा एक दुर्दैवी प्रकार  नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा येथे स्वस्त धान्य दुकानात आलेला हजारो किलो धान्य गरीब कुटुंबाना न वाटताच त्याची रवानगी काळाबाजार करण्यासाठी इतरत्र केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानीय गुन्हे शाखेने संबंधित दुकानावर छापा टाकला असता रेशन दुकानदाराने गरिबांच्या हक्काचे तब्ब्ल 4 हजार किलो तांदूळ दुसरीकडे साठवल्याचे उघड झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे दुकानाचे रजिस्टर चेक केले असता हे सर्व धान्य गरीब ग्राहकांना वाटल्याचे दर्शवण्यात आले होते. मात्र कोणत्याही गरिबाला धान्य न वाटता ते परस्पर बाहेर विकण्यासाठी इतरत्र साठविल्यामुळे शासनाची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या तांदळाच्या सर्व 81 पोत्यांवर शासनाची सील लागलेले आहे. पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानदार दिलीप कळमकर विरोधात गुन्हा दाखल करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना चौकशी सोपविली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपुरातील स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार सुरु असल्याचा आरोप आशिष जयस्वाल यांनी सुद्धा केला होता.


सिल्लेवाडा येथे स्वस्त धान्य दुकानात आलेला हजारो किलो धान्य गरीब कुटुंबाना न वाटताच त्याची रवानगी काळाबाजार करण्यासाठी इतरत्र केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानीय गुन्हे शाखेने संबंधित दुकानावर छापा टाकत कारवाई केली. यावेळी रेशन दुकानदाराने गरिबांच्या हक्काचे तब्ब्ल 4 हजार किलो तांदूळ दुसरीकडे साठवल्याचे उघड झाले आहे.


एकीकडे लॉकडाऊनमध्ये सरकार आणि प्रशासन गोरगरीब जनता उपाशी राहू नये यासाठी उपाययोजना करत आहे. मात्र अशा घटनांनी सरकारच्या या प्रयत्नांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.