मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. मातोश्रीनंतर कोरोनाने आता थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर धडक दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर राहत नसून ते त्यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर राहतात. असे असले तरिदेखील महत्त्वाच्या बैठका आणि शासकीय कामकाजांसाठी मुख्यमंत्र्यांची ये-जा वर्षा बंगल्यावर सुरू असते. याआधी मुख्यमंत्र्याचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातील चहावाल्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावरच या चहावाल्याचा स्टॉल होता.
कोरोना 'मातोश्री'च्या उंबरठ्यावर, मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण
मातोश्री परिसरात असणाऱ्या चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी मिळून 42 कर्मचाऱ्यांना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांची तातडीने कोरोना तापसणी देखील केली गेली होती. मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. जवळपास 180 हून अधिक कर्मचारी या परिसरात कार्यरत असतात. मातोश्रीनंतर आता कोरोनाने थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्याबाहेर धडक दिली आहे.
Coronavirus | राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; 100 कुटुंब सेल्फ क्वॉरन्टाईन
दरम्यान, देशाचे प्रथम नागरिक मानलं जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या दारातही कोरोनानं आता पाऊल ठेवलं आहे. राष्ट्रपती भवन परिसरात काम करणाऱ्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. त्यानंतर या परिसरातील जवळपास 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन करण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या :
परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी
मुंबई- पुणे भागात लॉकडाऊनबाबतीत सवलती रद्द, वाढलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
पालघर हत्याकांड | चार ड्रोनच्या माध्यमातून जंगलात फरार झालेल्या आरोपींचा शोध