मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांची तातडीने कोरोना तापसणी होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी बदलले जाण्याचीही शक्यता आहे. मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या कर्मचाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. जवळपास 180 हून अधिक कर्मचारी या परिसरात कार्यरत असतात. या घटनेनंतर वरिष्ठ पातळींवरच्या हालचाली वाढल्या आहेत.


मुंबईतील टॉप- 8 कोरोना हॉटस्पॉट


जी दक्षिण- 68 रुग्ण


परळ एसटी डेपो, वरळी गाव, वरळी डेअरी परिसर, वरळी बीडीडी चाळ, गांधी नगर, महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरु तारांगण, शांती नगर


ई वॉर्ड - 44 रुग्ण


जीजामाता उद्यान, माझगांव डॉक, कस्तुरबा हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जे.जे हॉस्पिटल


के वेस्ट- के पश्चिम - 37 रुग्ण


ओशिवरा, वर्सोवा, अंबोली हिल, सात बंगला, मनिष नगर -भवन्स कॉलेज, विले पार्ले- मीठीबाई कॉलेज परिसर, गिल्बर्ट हिल


डी - 3४ रुग्ण


बेलासिस चाळ, वेलिंग्टन स्पोर्ट क्लब, प्रियदर्शीनी पार्क, कमला नेहरु पार्क, ऑपेरा हाऊस, खेतेवाडी

के इस्ट- के पूर्व - 26 रुग्ण


जोगेश्वरी, गुंदवली, वेरावली, विजय नगर, सहार एअरपोर्ट, सहार व्हिलेज, चकाला, विले पार्ले टेलिफोन एक्सचेंज


एच इस्ट


वांद्रे पूर्व, टिचर्स कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, भारत नगर, खेरवाडी, वांद्रे टर्मिनस, धारावी कॉलनी, सांताक्रुझ, युनिव्हर्सिटी कँपस


पी नॉर्थ - 24 रुग्ण


पुष्पा पार्क, तानाजी नगर, लिबर्टी गार्डन, दिंडोशी, पिंपरी पाडा, मालाड ईस्टचा काही भाग


एम वेस्ट - 21 रुग्ण


टिळक नगर, छेडा नगर, माहुल व्हिलेज परिसर



संबंधित बातम्या