Nashik Cold : नाशिकच्या तापमानात कमालीची घट, ओझरच्या शाळा वीस मिनिटे उशिराने!
Nashik Cold : नाशिकच्या (Nashik) ओझर येथील तापमान घसरल्याने शाळा वीस मिनिटे उशिराने भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nashik Cold : नाशिकमध्ये (Nashik) कडाक्याची थंडी पडते आणि याच थंडीमुळे ओझरमधल्या (Ojhar) शाळा उशिराने भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओझरमध्ये सध्याचे तापमान 5.7 अंशात निफाड (Niphad) तालुक्यातील अनेक शाळा कडून सकाळच्या सत्रात वेळेमध्ये बदल होण्याची शक्यता सध्या व्यक्त होते. महाराष्ट्रातल्या (Maharashtra) बऱ्याचशा जिल्ह्यात पारा कमालीचा घसरल्याने नाशिकसह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली असून ओझरमधल्या शाळा आता उशिरा भरविण्याचा निर्णय घेतला जात आहे.
नाशिक जिल्ह्यात तापमानाचा पारा हा चांगला घसरत चालला असून विशेष म्हणजे निफाड तालुक्यातील ओझरमध्ये तापमानात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ओझर परिसरातील काही शाळा उशिराने भरविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सकाळी सकाळी येणारे विद्यार्थी काहीसे थंडीमुळे काहीसे उशिराने येत आहेत. यंदा नोव्हेंबर महिन्यातच तापमानाचा पारा हा चांगला घसरला असून निफाड, ओझरकर चांगलेच गारठले आहेत. त्यामुळे ओझर परिसरात माधवराव बोरस्ते या शाळेने सकाळच्या सत्रातील सात वाजता भरणारी शाळा वीस मिनिटे उशिराने भरविण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर तालुक्यातील ओझर शहर सर्वात थंड म्हणून नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पडल्याची दिसते. परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ही नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं हे निचांकी तापमान आहे. निफाड आजचे किमान तापमान 7 अंश सेल्सिअस एवढं आहे. त्यामुळे सकाळपासून ओझर वासियांना थंडीने कुडकुडण्याची वेळ आली आहे.
ओझरमधील यंदाच्या हंगामातील हे तापमान सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान वाढतंय थंडीच्या पार्श्वभूमीवर ओझर येथील दोन हजार पटसंख्येच्या शाळा असलेल्या माधवराव बोरस्ते शाळा व्यवस्थापनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येथील शाळेतील शिक्षक म्हणाले कि, माधवराव बोरस्ते शाळा दोन सत्रामध्ये शाळा भरते. शाळेची पटसंख्या २ हजार इतकी असून पाच ते सात सकाळ सत्र आणि आठ ते दहा दुपार सत्रामध्ये शाळा भरविण्यात येते. मात्र दोन दिवसांमधील पारा घसरल्याच्या अनुषंगाने शालेय प्रशासनाने पदाधिकारी, विद्यार्थी, पालक या सर्वांना विश्वासात घेऊन सात वाजता भरणारी शाळा वीस मिनिटे उहसीरने भरविण्यात येईल, असा निर्णय झाला. त्याचबरोबर शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून प्रथमी शारीरिक कवायती करून घेण्यात येत आहेत. जेणेकरून थंडीच्या पासून त्यांचा संरक्षण होईल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंबून करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने थंडीच्या काही उपाय योजना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
थंडी आणखी वाढणार
गेल्या दोन दिवसांपासुन नाशिककरांसह जिल्ह्यात हुडहुडी भरली असून आज अचानकपणे नाशिक शहराचा पारा 9.8 अंशावरून थेट 9.2 अंशापर्यंत घसरला. जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये महाराष्ट्रातील सार्वधिक थंडी पडल्याची नोंद झाली आहे. नाशिक मधील ओझर हे सर्वात थंड असून येथे 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा पारा अजूनच घसरल किमान तपात आणखी घट होईल अशी शक्यताही वर्तवली जाते. यामुळे निफाडवासीय यंदा चांगले गारठणार हे मात्र निश्चित.