एक्स्प्लोर
हिल स्टेशनवर घामाघूम, मुंबईपेक्षा महाबळेश्वरात तापमान जास्त
मुंबई : थंड हवेचं ठिकाण म्हणून महाराष्ट्रभरातील पर्यटक उन्हाळ्यात माथेरान, महाबळेश्वरकडे धाव घेतात. उष्णतेला कंटाळलेले मुंबईकरही वीकेंडला महाबळेश्वरला जाण्याचा विचार करत असतील, तर त्यांनी विचार बदलायला हरकत नाही. यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान हे आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने तापमानाची नोंद केली आहे. मुंबईच्या किनारी भागापेक्षा महाबळेश्वरमधील पारा हा सामान्यतः कमी असतो. हिवाळ्यात तर वेण्णा लेक परिसरातील तापमान शून्य अंशावर जातं.
महाबळेश्वर आणि मुंबईतील तापमानाची तुलना (अंश सेल्सिअस)
गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रत्यावर्त (अँटीसायक्लोन) मध्ये असलेल्या इशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरमधील तापमान वाढल्याची माहिती आहे. पूर्वेकडील वारे इशान्ये वाऱ्यात मिसळले आहेत. येत्या आठवड्यात हे वारे सरकल्यानंतर पुन्हा तापमान खालावेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.
सौराष्ट्र आणि कच्छमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत तापमान 35 अंशाच्या आसपास आहे. हवेतील उच्च आर्द्रतेमुळे मुंबईकरांना बेचैनी जाणवत आहे. येत्या काही दिवसात पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हं आहेत.
दिनांक (एप्रिल 2017) |
महाबळेश्वर |
|
||
5 | 32.6 | 33 | ||
6 | 33.1 | 33.5 | ||
7 | 32.1 | 31.5 | ||
8 | 34.5 | 32 | ||
9 | 35.8 | 34 | ||
10 | 35.6 | 34.4 | ||
11 | 35.5 | 34 | ||
12 | 35.2 | 35 | ||
13 | 35.9 | 35.2 |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement