एक्स्प्लोर

येत्या 48 तासांत कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

दक्षिणेकडून उत्तरेकडे 'महा' चक्रीवादळ सरकत असून परिणामी येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परिसरामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे : 'महा' चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 48 तास काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे 'महा' चक्रीवादळ सरकत असून परिणामी येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परीसरामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 तारखेनंतर पुण्याला पाऊस झोडपण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील 'महा' या चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसण्याची शक्यता असल्याचा अंजाजही हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे आधीच नुकसानीत अडकलेला शेतकरी आता पुढचे काही दिवस आणखी भरडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. 3, 4 आणि 5 नोव्हेंबरला पुणे शहरात पावसाची शक्यता नाही. पण 6 नोव्हेंबरनंतर पावसाला पुणे शहरात पुन्हा एकदा सुरुवात होईल. तर 7 नोव्हेंबरला पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून महाराष्ट्र -गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्यानं केले आहे. 'महा' हे वादळ 40 ते 60 किलोमीटरच्या गतीनं उत्तरेकडे सरकत असून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर 8 ते 12 फूट उंचीच्या लाटांची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget