एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओबीसी मुद्द्यावरून अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी
अर्थसंकल्प मांडताना विधीमंडळातील राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला. यावर ओबीसींच्या हक्कांची घोषण करताना विरोधक बाधा आणत असल्याचा पलटवार सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर फडणवीस सरकारनं 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. पण हा अर्थसंकल्प मांडताना विधीमंडळातील राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मुनगंटीवार ओबीसीसंदर्भातल्या योजनांचं वाचन करत असतानाच सभागृहात गोंधळ उडाला. त्यामुळे ओबीसींच्या हक्कांची घोषण करताना विरोधक बाधा आणत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे.
Ajit Pawar | मंत्री मागे कसे? ही काय पद्धत झाली का? - अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल | ABP Majha
सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करताना विरोधकांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत भाषण सुरू असताना गोंधळ घातला. यावेळी अजित पवारांनी अर्थसंकल्पाच्या प्रती दाखवत सभागृहात आक्षेप नोंदवला. तसेच सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना, त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातले मुद्दे ग्राफिक्ससह पोस्ट होत असल्याचं त्यांनी सभागृहासमोर मांडत विरोधकांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला.
ज्यावेळी हा गोंधळ सुरू होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार ओबीसीसंदर्भातल्या योजनांचं वाचन करत होते. त्यामुळे ओबीसींच्या हक्कांची घोषण करताना विरोधक बाधा आणत असल्याचा पलटवार सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे. अखेर विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान या गोंधळानंतर मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर दिलं.
दरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, सरकारने अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करुन विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement