नवी दिल्ली: खासदार नवनीत राणांच्या (Navneet Rana) तक्रारीनंतर आता लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला अहवाल देण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. येत्या 24 तासांमध्ये हा अहवाल द्यावा असे निर्देश लोकसभा सचिवालयाने दिले आहे. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यासंबंधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. 


खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नाही. माझ्या जातीवरुन माझा पोलीस ठाण्यात छळ केला गेला. खालच्या जातीची असल्याने मला बाथरुम वापरु दिलं नाही." आता त्याची तातडीने दखल लोकसभा सचिवालयाने घेतली आहे. लोकसभा सचिवालयाच्या निर्देशांनंतर आता राज्याला 24 तासात यासंबंधी हा अहवाल देण्याचं बंधनकारक आहे. 


नवनीत राणा या लोकसभेच्या सदस्या आहेत, त्यामुळे त्यांना काही विशेषाधिकार आहेत. नवनीत राणा यांनी आपल्याला पाणीसुध्दा मिळालं नाही, बाथरुमला जाऊ दिलं नाही अशा प्रकारचे आरोप केले आहे. त्यामुळे लोकसभा सदस्यांच्या विशेषाधिकाराचं उल्लंघन झालं असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 


खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या या आरोपांची सत्यता पडताळणी या अहवालामध्ये केली जाणार आहे. याच्या आधीही खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांवर हक्कभंग मांडला होता. अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधीच्या प्रकरणात हा हक्कभंग मांडला होता. त्यावरही लोकसभा सचिवांनी तातडीने दखल घेण्यात आली होती. 


महत्त्वाच्या बातम्या :


Navneet Rana : राणा दाम्पत्याला धक्का, दोन वेगळे गुन्हे दाखल होणं आवश्यक असल्याचं सांगत राणांची याचिका फेटाळली
Navneet Rana : राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली; जाणून घ्या कोर्टात नेमकं काय घडलं
Attack on Kirit Somaiya : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह तीन नगरसेवकांना अटक