![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pratibha Dhanorkar : पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय; बाळू धानोरकरांच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
Maharashtra Politics: काँग्रेस पक्षातलेच काही लोक सातत्याने माझा विरोध करत आहे आणि याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.
![Pratibha Dhanorkar : पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय; बाळू धानोरकरांच्या पत्नीचे खळबळजनक आरोप lok sabha elections 2024 congress fight over Chandrapur constituency seat pratibha dhanorkar claim My husband lost his life because of congress internal opposition maharashtra politics marathi news Pratibha Dhanorkar : पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय; बाळू धानोरकरांच्या पत्नीचे खळबळजनक आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/1aa5df370149acfb5f743db8a4cef7831710153498759892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mahrashtra Politics चंद्रपूर: काँग्रेस (Congress) पक्षातलेच काही लोक सातत्याने माझा विरोध करत आहेत आणि याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय, असा खळबळजनक आरोप दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी केला आहे. इतकच नाही तर आमच्या पक्षात भाजपच्या (BJP) पेरोलवर चालणारे काही लोकं आहेत. भाजपवाले जे ऑर्डर देतात ते-ते ऑर्डर ते फॉलो करत असल्याचे देखील प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून त्यांचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, या बाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नसली तरी अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पक्षात भाजपच्या पेरोल वर चालणारे काही लोक कार्यरत
गेल्या काही दिवसांपासून मी नाराज असून मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. यामागे आमच्याच पक्षातील लोकांचा हात असून हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून होत असल्याचा गंभीर आरोप देखील प्रतिभा धानोरकर यांनी केलाय. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, चंद्रपूर लोकसभेवर कोणीही दावेदारी केली तरी पहिला हक्क माझा आहे. नुकतीच मी काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला याची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी माझे सगळं ऐकून घेतले आणि या संदर्भात मी सकारात्मक असल्याचे देखील त्यांनी मला सांगितले आहे. काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही. अद्याप कुठलीही यादी जाहीर झाली नसल्याने याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. मात्र काहीही झाले तरी मी काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार असल्याचा पुनरुच्चार देखील प्रतिभा धानोरकर यांनी बोलताना केला आहे.
दिल्लीला शिष्टमंडळ नेल्याने उमेदवारी मिळत नाही
चंद्रपूर-वणी लोकसभा मतदार संघात दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा हा मतदार संघ होता आणि अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव हा मतदार संघ काँग्रेसने राखला. त्याच्यामुळे पक्षाने आदेश जरी दिला नसेल तरी या लोकसभेची दावेदार म्हणून मी माझी पूर्वतयारी चालू केली असल्याचे देखील प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रपूरमधून उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात हेल्दी कॉम्पिटिशन असल्याची चर्चा रंगत दिसत आहे. याबत प्रतिभा धानोरकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, शिवानी वडेट्टीवार या काही माझ्या प्रतिस्पर्धी नाही. शिवाय कोणी दिल्लीला शिष्टमंडळ नेल्याने तिकीट मिळाले असे आहे. मात्र याबाबत आता पक्ष जो निर्णय देईल त्याचे मी पालन करणार असल्याचे देखील प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)