एक्स्प्लोर

Lok Sabha Election : मतदान पार पडल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवरुन समनक पार्टीचा आक्षेप

Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. यावर समनक पार्टीने आता हरकत घेत तक्रार दिली आहे. 

Yavatmal Washim Lok Sabha : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील मतदारांचा कौल 26 एप्रिलला मतपेटीत बंद झाला आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाप्रती असलेली उदासीनता आणि उष्णतेची लाट इत्यादी कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालेले नाही.

असे असले तरी यवतमाळ-वाशिम (Yavatmal Washim) लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर मतांच्या टक्केवारीत अचानक वाढ झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या व्हायरल पोस्ट मुळे नागरिक आणि राजकीय वातावरणात काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. असे असताना या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या अंदाजावर समनक पार्टीने हरकत घेत तक्रार दाखल केली आहे. 

व्हायरल पोस्टवरुन समनक पार्टीचा आक्षेप

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या मतदानानंतर मतदान टक्केवारीत कालांतराने वाढ होतेच कशी? असा सवाल समनक जनता पार्टीने उपस्थित केला आहे. परिणामी, यासंबंधी निवडणूक विभागाकडे तक्रार देखील दाखल केली आहे. मतदानाच्या दिवशी झालेला गैरप्रकार, मतदानाचा अंदाज सोशल मीडियावर प्रसारित करून एकूणच मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याबद्दल समनक जनता पार्टीने हरकत घेतली आहे. याप्रकरणी 13 मे रोजी वाशिम जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

....अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेऊ!

या तक्रारीत नमूद केले आहे की, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडली. या दिवशी मतदानाच्या टक्केवारीत कालांतराने 5.87 टक्के मतदान वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा आशयाची एक पोस्ट काही दिवसांपासून व्हायरल होते आहे. तसेच हा प्रकार मतदारांची दिशाभूल करणारा असून यात विजयी उमेदवाराबाबतचा अंदाजदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा की या पोस्टला कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे किंवा आधार नाही. असे सांगत समनक पार्टीने यावर हरकत घेतली आहे. यावेर वेळीच कारवाई व्हावी, अन्यथा वेळप्रसंगी आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असेही समनक जनता पार्टीने तक्रारीत नमूद केले आहे. 

दोषींवर कारवाईची मागणी 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी यवतमाळ शहरात भाजपचे कार्यकर्ते लोकांच्या बोटाला शाई लावताना आढळून आले  होते. त्या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या उमेदवारांना किती मते मिळणार, यावरून आकडेमोड करत काही संदेश फिरवले जात आहेत. या सगळ्या विरोधात समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक अनिल राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

  • Yavatmal News : पोलिसांना सांगून सांगून वैतागले, भाजप आमदार स्वत:च मटका अड्ड्यावर धाडीसाठी पोहोचले!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget