Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी मतदान, अर्ज भरण्यासाठी होणार इच्छुकांची धावाधाव, कारण काय?
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे.
Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर केल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार असून महाराष्ट्रात (Maharashtra News) पाच टप्प्यात निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 20 मार्चपासून उमदेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज भरण्यासाठी होणार इच्छुकांची धावाधाव
27 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. परंतु यामध्ये शनिवार, रविवार व सोमवारी धुलीवंदनाची सुटी असल्याने उमदेवारीसाठी दोनच दिवस मिळणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छूक उमेदवारांची धावाधाव होणार आहे.
महराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार
19 एप्रिल - रामटेक , नागपूर, भंडारा - गोंदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर
26 एप्रिल - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंणगले
13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर - पश्चिम मुंबई, उत्तर - पुर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई , दक्षिण मुंबई.
भाजपाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 15 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात पुदूच्चेरी तसेच तमिळनाडू राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. भाजपने या यादीत तमिळनाडूतील (Tamil Nadu) प्रसिद्ध अभिनेत्री राधिका सरथकुमार (Radhika Sarathkumar) यांनादेखील तिकीट दिले आहे. राधिका सरथकुमार या विरुदनगर (Virudhunagar) येथून निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार
17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार आहे. 24 जून रोजी मुदत संपत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या