मुंबई : महाराष्ट्र शासनाने 4 मे पासून लॉकडाऊन कालावधीत काही अटी-शर्थी घालून काही सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. मात्र मुंबईत देण्यात आलेली शिथिलता रद्द करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी विशेष अधिकारात सर्व शिथीलता रद्द करुन केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


लॉकडाऊनदररम्यान सूट दिल्याने लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची दाट शक्यता आहे आणि कोरोनाचा सामना करताना इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. ही बाब लक्षात घेत आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईसाठीची शिथितलता रद्द करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, उद्यापासून मुंबईत पूर्वीप्रमाणेच फक्त अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील, असे आदेश दिले आहेत.


मुंबईत लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर रस्त्यावर खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषत: दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. हीच बाब लक्षात घेत मुंबई महापालिका आयुक्तांनी शिथिलता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत उद्यापासून दारूच्या दुकानांसह इतर दुकाने पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकानेच उघडी राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशाची मुंबईत अंमलबजावणी करण्यात येणार असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 188 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या