नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 46 हजार 433 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 1020 रुग्णांवर उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभरात 12 हजार 726 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 27.41 टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.


आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण 32 हजार 138 कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर गेल्या 24 तासात 3900 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकड 46 हजार 433 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासात 195 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी म्हटलं की, कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जावे, यासाठी लग्न किंवा इतर समारंभात 50 हून अधिक लोकांना एकत्र जमण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याशिवाय मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठीही जास्तीत जास्त 20 लोकांना जमण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगचं पालक करणे महत्त्वाचे आहे.


सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियामाचं पालन होणे गरजेचं आहे. सर्व खासगी कार्यालयाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे, असं गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिवानी सांगितलं. तसेच परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी भारत सरकार आणणार आहे. मात्र या नागरिकांना त्यांचा प्रवासाचा खर्च स्वत: करावा लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या 




 Coronavirus | ज्येष्ठांपाठोपाठ वजन जास्त असलेल्यांना कोविडचा धोका