एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मे 2020 | मंगळवार

1. देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 46,433 वर, गेल्या 24 तासात 1020 रुग्णांना डिस्चार्ज, तर रिकव्हरी रेट 27.41 टक्के, आरोग्य मंत्रालयाची माहिती 

2. शांतता काळातलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन; 13 देशात अडकलेल्या 15 हजार भारतीयांना एका आठवड्यात मायदेशात आणणार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, एअर इंडिया, खासगी विमान आणि नेव्हीची मदत घेणार

3. विप्रो पुण्यातील हिंजवडीत कोविड रुग्णालयाची उभारणी करणार, 450 खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासोबत करार 

4. जेईईची परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान, तर नीटची परीक्षा 26 जुलैला होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून नव्या वेळापत्रकाची घोषणा तर विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर होणार, उदय सामंत यांची माहिती 

5. लोकांच्या हातात पैसे दिले तरच अर्थव्यवस्था रुळावर येईल, अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत राहुल गांधी यांचा संवाद 

6. कोविड-19 विरोधात लस तयार, लवकरच पेटंट मिळवणार; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा 

7. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा होणार, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा निर्णय तर आषाढी वारीबद्दलही पालखी प्रमुखांशी चर्चा करा, वारकऱ्यांची मागणी 

8.सलग दुसऱ्या दिवशी दारुसाठी लांबच लांब रांगा, मद्यासाठी 4 ते 5 तासांची प्रतीक्षा, तर काल दिवसभरात राज्यात 3 लाख लीटर दारू विक्री

9. हापूस आंब्याला कोरोनापाठोपाठ तापमान वाढीचा फटका, अतिउष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात फळगळ

10. अमेरिकेतील रुग्णसंख्या 12 लाख 12 हजाराच्या घरात, इराणमधील कोरोनाग्रस्तांची संख्याही एक लाखानजीक, जगभरात अडीच लाख मृत्यूमुखी

BLOG | सोनझरी.. दोन वेळची भाकर मिळावी म्हणून माती धुणारी माणसं, कपिल श्यामकुंवर यांचा ब्लॉग 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम -  https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR