एक्स्प्लोर

परराज्यातील घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून रेल्वेने तिकीट आकारू नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विनंती

कोरोनामुळे या मजुरांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे.

मुंबई : परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची  आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव , पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार व श्रमिकांची पाठवणी त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरु झाली आहे. भिवंडी, नाशिकहून विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत. मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख व समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. सुमारे 5 लाख परप्रांतीय मजुरांची राज्य शासनाने त्यांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची साधारणत: 40 दिवस व्यवस्था केली. तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था आजही सुरूच आहे.

नागपुरातून 1200 मजुरांना घेऊन विशेष 'श्रमिक' एक्स्प्रेस उत्तर प्रदेशला रवाना

मजूर रोजीरोटी कमावणारे व हातावर पोट असणारे आहेत. ते गरीब असून कोरोनामुळे हतबल झाले आहेत, अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसेही नसतील. काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी तिकिटाचे कमी पडलेले पैसे भरून या मजुरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले तर या काळात त्यांना आधार मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

सध्या या राज्यांतील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी रेल्वेशी देखील चांगला समन्वय ठेवण्यात आला आहे. इतर राज्य सरकारांशी सुद्धा चांगला समन्वय ठेवावा तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी व इतर कागदपत्रे यांची पूर्तता करून घेऊन त्यांना पाठवावे. यामध्ये कुठेही गोंधळ होऊ नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सकारात्मक! राज्यात आज 115 जण कोरोनामुक्त; आत्तापर्यंत 2 हजार 115 रुग्ण उपचारानंतर घरी

निवारा केंद्रातील सार्व कामगारांची यादी अद्ययावत करावी तसेच आज ना उद्या मुंबई, ठाणे , पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यास या कामगारांच्या प्रवासाचे  व्यवस्थित नियोजन जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यांतर्गत ठिकठिकाणी अडकलेल्या व्यक्ती व प्रवाशांचे गट यांना त्या त्या जिल्ह्यांत जाण्याची परवानगी ही सर्व बाबींचा विचार करून व लॉकडाऊन नियमाप्रमाणे करावी तसेच यात तक्रारी येऊ देऊ नयेत. अडकलेल्या व्यक्ती या नागरिक आहेत, परिस्थितीमुळे त्यांना थांबावे लागले आहे त्यादृष्टीने याकडे पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय काय म्हणाले?
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय म्हणाले?
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Embed widget