एक्स्प्लोर
वडिलांचा मृत्यू, चिमुकलीचा जन्म आणि 5 जणांना संजीवनी...

नांदेडः सोमवारी रात्री नांदेड-हैद्राबाद रोडवर संतोष मोरे यांचा अपघात झाला. पत्नीची डिलेव्हरी असल्याने संतोष सुट्टीवर गावी आले होते. पण दुर्दैव असं, की प्रसूतीकळा सुरु झाल्याने संतोषच्या पत्नीला तिथेच दाखल करण्यात आलं, ज्या रुग्णालयात संतोषला दाखल करण्यात आलं. इकडे पत्नीने एका गोड मुलीला जन्म दिला आणि तिकडे संतोषने या जगाचा निरोप घेतला. पण जगाचा निरोप घेण्यापूर्वी संतोषने 5 जणांना जीवदान दिलं. संतोषने 5 जणांना जीवनदान दिलं! संतोष ब्रेन डेड असल्याने त्यांच्या परिवाराने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. सकाळी एका ऑपरेशन थिएटरमध्ये संतोषच्या अवयवदानाची शस्त्रक्रिया सुरु होती. तर शेजारच्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या पत्नीची प्रसूती सुरु होती. त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि इकडे संतोषने या जगाचा निरोप घेतला. संतोषने 5 लोकांना जीवदान दिलं. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलीचं नावही संजीवनी ठेवलं. संतोषच्या हृदयासाठी गरजू रुग्ण उपलब्ध झाला नाही पण यकृत, किडनी आणि डोळे हे एकूण 5 गरजूंना बसवण्यात आले. नांदेडमध्ये एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडॉर अवयव हे प्रत्यार्पणासाठी विमानाने नियोजित वेळेत पाठवायची होते. त्यासाठी पोलिसांनी मागील अनुभव लक्षात घेऊन यावेळीही ग्रीन कॉरिडॉर तयार केला. अवघ्या 11 मिनिटांत 14 किलोमीटर अंतर विना अडथळा पूर्ण केलं. नांदेड शहरात एकाच आठवड्यात अवयवदान प्रक्रिया दुसऱ्यांदा पार पडली. पहिल्यावेळी नागरिकांना याबाबत फारशी माहिती नव्हती. पण यावेळी मात्र संपूर्ण नांदेडकर या मोहिमेत सहभागी झाले.
आणखी वाचा























