CORONAVIRUS UPDATES | नवी मुंबईत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; न्युयॉर्कवरून आलेल्या तरुणाला लागण
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
मुंबईत कोरोनाचा चौथा बळी
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी गेला आहे. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. मृत व्यक्तीला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
कोरोनानंतर आता चीनमध्ये हंता व्हायरस
करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या करोना व्हायरसने अत्तापर्यंत जगभरात हजारो बळी घेतले आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखीन एका व्हायरसची भर पडली आहे. ‘हंता’ नावाचा जीवघेणा व्हायरस चीनमध्ये पसरण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
21 दिवसांसाठी लॉकडाऊन
'करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा
सरकारी रुग्णालयांमध्ये मास्कचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून रुग्णालयातील वस्तूंचा तुटवडा आणि डॉक्टरांच्या समस्यांबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, पीपीई किट्स आणि उपलब्ध नसलेल्या मास्क याबद्दल सांगण्यात आले आहे. दरम्यान, जे डॉक्टर्स कस्तुरबा रुग्णालयात आणि विमानतळावर कार्यरत होते. त्यापैकी काही डॉक्टर हे करोना संशयित आहेत. त्यामुळे त्यांना अलग ठेवण्यात आले आहे.