Cornavirus Updates | नवी मुंबईत होम कॉरंटाईनचा दुसरा गुन्हा दाखल

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.inदेशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Mar 2020 10:40 PM
नवी मुंबई :नवी मुंबईत होम कॉरंटाईनचा दुसरा गुन्हा दाखल. सानपाडा येथे महिलेवर गुन्हा दाखल. होम कॉरंटाईन केलेली महिला घर सोडून मुंबईत गेली होती. मनपा प्रशासनाकडून दुसरा गुन्हा दाखल.
सांगलीत कोरोनाचे चार रुग्ण आढळल्याने पोलीस यंत्रणा अधिक अलर्टवर, शहरामध्ये हुल्लडबाजी आणि विनाकारण रस्त्यावर थांबणाऱ्या तरुणांवर पोलिसांची कारवाई, जिल्ह्यामध्ये संचारबंदी असतानासुद्धा नागरिकबाहेर पडत असल्याने पोलीस रस्त्यावर
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 97 झाली आहे. सांगलीत चार नवीन रुग्ण आढळले. तर मुंबईत तीन आणि साताऱ्यातही एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे.
साताऱ्यातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संबधित 45 वर्षाची महिला ही सातारा जिल्ह्यात राहणारी असून ती दुबई येथून मुंबईत आली होती. मुंबईतून ती रात्री साताऱ्याला येत असताना तीला रस्त्यातच त्रास होऊ लागल्यामुळे ती साता-यातील खंडाळा ग्रामिण रुग्णालयात गेली. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही वेळापुर्वी जिल्हा रुग्णालयात रिपोर्टआले असून ही महिला कोविड19 बाधित असल्याचे समोर आले आहे. या बाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वत्र जमावबंदी लागू केली असतानाही रस्त्यावर अनावश्यकपणे वाहन घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भिवंडी तालुक्यातील अंबाडी या ठिकाणी असेच एक टोळके बाईक घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्यांना पकडून भर रस्त्यावर त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा ठोठावली. या शिक्षेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र पोलिसांच्या कर्तबगारीची कौतुक होत आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या 433 वर. केरळमध्ये सर्वाधिक 95; केरळात एकाच दिवसात 24 जण कोरोना पॉजिटिव्ह
सांगलीतील इस्लामपूरमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले.

चारही जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहे.

सौदेअरेबियामधून हे आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळूखे यांनी ही माहिती दिली.
वाशिम : नागपूर औरंगाबाद महामार्गावर शेलुबाजार जवळ वाशिम पोलिसांची खाजगी वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेर जाणारे सगळे वाहन तपासणी करून सोडून देण्यात येत आहे.
जीवनावश्यक गोष्टींची सर्व दुकाने आणि वाहतूक चालूच राहणार आहे. कृषि साहित्य असणारी दुकानेही उघडीच लागणार आहे. ज्यातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे, मात्र, आपत्कालीन परिस्थितीत खासगी टॅक्सींना परवानगी देण्यात येणारी आहे.
हिंगोली : दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात आज संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी हिंगोली शहरात सायंकाळचे दृश्य पाहता मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. मागील दोन दिवस कडकडीत बंद पाळल्यानंतर आज सायंकाळी मात्र पहिले पाढे पच्चावन्न, असेच काहीसे चित्र बघायला मिळाले. आठवडी बाजारातील भाजीपाल्याच्या दुकानावर ही सायंकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. घराबाहेर न पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले असतानाही हिंगोलीकर मात्र खुलेआम रस्त्यावर फिरतायत. त्यामुळे हम नही सुधरेंगे असं म्हणण्याची वेळ आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी हा विषाणू पोहचला नाही. तो तिथं आपल्याला पोहचू द्यायचा नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमाही आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आंतरर्गत विमान वाहतूकही बंद करण्याची विनंती मी पंतप्रधान मोदी यांना पंत्र लिहून केली आहे.
हिंगोली : दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात आज संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी हिंगोली शहरात सायंकाळचे दृश्य पाहता मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. मागील दोन दिवस कडकडीत बंद पाळल्यानंतर आज सायंकाळी मात्र पहिले पाढे पच्चावन्न, असेच काहीसे चित्र बघायला मिळाले. आठवडी बाजारातील भाजीपाल्याच्या दुकानावर ही सायंकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. घराबाहेर न पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले असतानाही हिंगोलीकर मात्र खुलेआम रस्त्यावर फिरतायत. त्यामुळे हम नही सुधरेंगे असं म्हणण्याची वेळ आली आहे.
सर्वांनी काल जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. मात्र, थाळ्या वाजवणे म्हणजे व्हायरस घालवणे नाही. पुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे नाईविलाजाने राज्यात मला संचारबंदी जाहीर करावी लागणार आहे.
आपल्या प्रेमापोटी मी सर्वांना सूचना देतोय. आपण सध्या कोरोनाच्या निर्णायक टप्प्यावर आलो आहे. आज आपण याला रोखू शकलो नाही. तर, जगात जे थैमान सुरू आहे. तसं आपल्याकडे होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्यीय विमान उड्डाणं बंद करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता देशातील सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतूक विमाने सुरू असणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीडच्या जिल्हा प्रशासनाने आज रात्री बारा वाजल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीची वेळ यामध्ये ठरवून दिली आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या चार तासांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी लोक करू शकतात. मात्र याच वेळी सुद्धा जमावबंदी असणार आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीची बैठक बोलावली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थतीत बैठक सुरू झालीय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसद अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याची शक्यता आहे. लवकरच महाराष्ट्र शासन असा निर्णय घेण्याची सुत्रांची माहिती आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला हाणला आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की, लॉकडाऊनला लोक गांभिर्याने घेत नाहीत. प्रिय पंतप्रधानजी तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलं तर असंच होणार आहे. सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, अशी टीकाही राऊतांनी केली आहे.

नाशिक : जमावबंदी आदेश असतानाही नाशिकमधील अनेक आस्थापना, खाजगी कंपन्या सुरु, अंबड आणि सातपूर परिसरात पोलिसांकडून खाजगी कंपन्या बंद करण्याचे आवाहन, अनेक कंपन्यांना पोलिसांकडून नोटीस दिल्या जाणार, पाच पेक्षा अधिक व्यक्ती दिसून आल्यास संबंधितांवर होणार कारवाई
सांगलीत सीमा बंदीच्या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी गर्दी , महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवर, पेठ नाका येथे तर इस्लामपूर-सांगली रोडवर पोलिसांची नाकाबंदी सुरु, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व चारचाकी व दुचाकी गाड्या रोखण्यचे काम सुरू
कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे याची गांभीर्याने दक्षता घ्याल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला आज केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सांगलीतील द्राक्ष बागायदार मोठ्या अडचणीत, जिल्ह्यातील 35 टक्क्यांहून अधिक द्राक्षबागा निर्यात होण्याच्या बाकी, वाहतूक बंद असल्याने व्यापारी येत नसल्याने आणि मजूर मिळत नसल्याने द्राक्ष बागा निर्यातीविना
नवी मुंबई : एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद, मुंबई-पुण्यात लोकांनी येऊ नये यासाठी बंद, दोन्ही प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त, बॅरेकेट्स लावून एक्सप्रेस वे बंद
मीच आहे माझा रक्षक याला महत्व आहे, मी स्वतःची सुरक्षा स्वतः करीन असा विचार सर्वांनी करणं गरजेचं : आरोग्यमंत्री राजेश टोपे
89 पैकी 2 जण आयसीयूमध्ये : राजेश टोपे
सर्व मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग फॅसिलिटी - राजेश टोपे
सर्व मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग फॅसिलिटी - राजेश टोपे
मुंबईमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका 68 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेला करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. या महिलेला करोना झाल्याचे 18 मार्च रोजीच्या चचणीमध्ये

उघडं झालं आहे. 7 मार्च रोजी मुंबईतील मध्यवर्ती भागामध्ये राहणारा 49 वर्षीय व्यक्ती अमेरिकेहून परत आला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी ही महिला साफसफाईसाठी रोज जात होती. दहा दिवसानंतर म्हणजे 17 मार्च रोजी या व्यक्तीला करोना झाल्याचे उघड झाले.
देशातील्या सर्वच राज्यांमध्ये लाँक डाऊन करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही केंद्र सरकारकडूनही देण्यात आले आहेत.
देशातील्या सर्वच राज्यांमध्ये लाँक डाऊन करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही केंद्र सरकारकडूनही देण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या पर्श्वभूमीवर भाजप नेते माजी मंत्री विनोद तावडे यांनी सरकारने दिलेली सुरक्षा सोडली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुरक्षा सोडत असल्याची माहिती त्यांनी दिली. या सुरक्षारक्षकांना लॉकडाऊनच्या कामासाठी अतिरिक्त बळ म्हणून वापरता यावं यासाठी सुरक्षा सोडल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच इतर महत्वाच्या व्यक्तींना गरज नसल्यास त्यांचीही सुरक्षा कमी करण्यासंदर्भात विचार करावा, असा प्रस्तावही त्यांनी दिली.
महाराष्ट्रावरही कोरोनाचं सावट पसरलेलं आहे. अशातच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. राज्यात एकूण 89 कोरोनाग्रस्त आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 89वर, काल संध्याकाळपासून 15 नवे रुग्ण
मुंबई लोकलसह देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद, मेट्रो, मोनोची सेवाही रद्द, फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बससेवा उपलब्ध असणार, शहरांपासून खेड्यापाड्यात धावणारी एसटीही थांबणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी मान्य, पाच एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता 26 एप्रिलला होणार
कोरोनामुळे वीज ग्राहकांना आता सरासरी बिल मिळणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा बिल छपाई न करण्याचा निर्णय
नोटांची छपाई आणि पासपोर्टलाही कोरोनाचा फटका, 31 मार्चपर्यंत नाशिकची करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस बंद
मुंबई आणि ठाण्यात वृत्तपत्र विक्रेते व्यवसाय बंद ठेवणार, आता दारोदारी वृत्तपत्र येणार नाहीत, 31 मार्चपर्यंत वृत्तपत्र न विकण्याचा पवित्रा
महाराष्ट्रात अकरा नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 75वर, तर देशातल्या रुग्णांचा आकडा 396 पार, मुंबई, पाटणा आणि सूरतमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू
कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री घोषणा, नागरी भागात जमावबंदीचे आदेश, फक्त जीवनावश्यक वस्तूच मिळणार, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू

पार्श्वभूमी

 




    1. लोकलसह देशभरातली प्रवासी रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद, मेट्रो, मोनोची सेवाही रद्द, फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बससेवा उपलब्ध असणार





 




    1. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची घोषणा, नागरी भागात जमावबंदीचे आदेश, फक्त जीवनावश्यक वस्तू मिळणार





 




    1. 11 नवे रुग्ण आढळल्यानं राज्यात एकूण 75 कोरोनाग्रस्त, तर देशातल्या रुग्णांचा आकडा 396च्या पार, मुंबई, पाटणा आणि सूरतमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू





 




    1. मुंबई, ठाण्यात वृत्तपत्र विक्रेते व्यवसाय बंद ठेवणार, दारोदारी वृत्तपत्र येणार नाही, ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र न विकण्याचा पवित्रा





 




    1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी मान्य, 5 एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 26 एप्रिलला होणार





 




    1. कोरोनामुळे जगभरात 14 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, इटलीत मृतांची संख्या साडेपाच हजार, अमेरिकेत 24 तासात 100 दगावले



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.